Mumbai BMC elections: मुंबईत राजकीय धमाका! उद्धव ठाकरे सेनेच्या फायरब्रँड नेत्या भाजपच्या वाटेवर; बड्या नेत्याच्या भेटीने खळबळ!

Shivsena Leader resignation News : भाजपने येत्या काळात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे एक एक मोहरे गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. विशेषता ठाकरे यांच्या शिवसेनेतील नाराज असलेल्या माजी नगरसेवक व माजी महापौर यांच्यासाठी गळ टाकला जात आहे.
uddhav thackeray
uddhav thackeraysarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. त्यापूर्वीच राजकीय घडामोडीना वेग आला आहे. भाजपने येत्या काळात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे एक एक मोहरे गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. विशेषता ठाकरे यांच्या शिवसेनेतील नाराज असलेल्या माजी नगरसेवक व माजी महापौर यांच्यासाठी गळ टाकला जात आहे. दोन दिवसापुर्वीच उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या माजी नगरसेविका शीतल देवरुखकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर रविवारी दुपारी मुंबईतील माजी महापौर शुभा राऊळ यांनी भाजप नेत्याची भेट घेतली आहे. त्यामुळे लवकरच त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

मुंबईतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसनेच्या (Shivsena) नेत्या व माजी महापौर शुभा राऊळ यांनी भाजपचे मंत्री आशिष शेलार व भाजप नेते प्रवीण दरेकर यांची रविवारी दुपारी भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीचे फोटो प्रसारमाध्यमावर व्हायरल झाले आहेत. तर दुसरीकडे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे लवकरच त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

uddhav thackeray
Congress BJP Riot : काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमने-सामने येताच भडका; लाठ्या-काठ्या, दगडांचा मारा अन् लाठीचार्ज...

शुभा राऊळ या 2007 ते 2009 या दरम्यान मुंबई महापलिकेच्या महापौर होत्या. जवळपास ३३ महिने त्यांनी महापौर पद भूषवले. नगरसेविका म्हणून त्यांनी मुंबईतील दहिसर प्रभागाचे सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून कार्यरत होत्या. त्यासोबतच महाराष्ट्र सरकारच्या 'कोविड-१९ आयुष टास्क फोर्स'च्या त्या सदस्य राहिल्या आहेत. तसेच त्यांनी महापालिकेच्या विविध वैधानिक समित्यांवर काम केले आहे.

uddhav thackeray
Shivsena Congress Alliance : एकनाथ शिंदेंना काँग्रेसची मदत, छुपी युती...; आमदार नरेंद्र मेहतांच्या आरोपाने खळबळ

1998 मध्ये शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी काही काळ मनसेमध्ये प्रवेश केला होता, परंतु नंतर त्या पुन्हा शिवसेनेत परतल्या होत्या. दरम्यान, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सर्व पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी भाजपचे मंत्री आशिष शेलार व भाजप नेते प्रवीण दरेकर यांची भेट घेतली आहे. त्यामुळे लवकरच त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

uddhav thackeray
BJP VS NCP : राष्ट्रवादीचा भाजपला खणखणीत इशारा; ‘आम्हालाही सर्व पर्याय खुले...’

दरम्यान, माजी नगरसेविका शीतल देवरुखकर यांनी निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी न मिळाल्याने 'मातोश्री'ची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता माजी महापौर शुभा राऊळ या देखील भाजपच्या वाटेवर असल्याचे समजते. त्यामुळे मुंबईच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

uddhav thackeray
Congress Support Thackeray : वंचित-काँग्रेसची थेट ठाकरे बंधूंना मदत, नव्या रणनीतीमुळे भाजप टेन्शनमध्ये

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com