Amol Kirtikar : अमोल कीर्तिकरांच्या निवडणूक याचिकेवर हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल; काय होणार वायकरांचं?

North West Lok Sabha Constituency Results Election Petition : रवींद्र वायकर यांनी लोकसभा निवडणुकीत अमोल कीर्तिकरांचा केवळ 48 मतांनी पराभव केला होता.
Amol Kirtikar, Ravindra Waikar
Amol Kirtikar, Ravindra WaikarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मागील सहा महिन्यांपासून उत्सुकता शिगेला पोहचलेल्या मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निकालाविरोधातील याचिका अखेर मुंबई हायकोर्टाने गुरूवारी निकाली काढली. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या विजयावर उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी आक्षेप घेतला होता.

वायकर यांचा अवघ्या 48 मतांनी विजय झाला होता. या विजयावर आक्षेप घेणारी निवडणूक याचिका कीर्तिकरांनी जून महिन्यात हायकोर्टात दाखल केली होती. निकालाला स्थगिती देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेमध्ये अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. मतमोजणीवेळी पारदर्शकता नसल्याचे आणि त्रुटी असल्याचा दावाही याचिकेत करण्यात आला होता.

Amol Kirtikar, Ravindra Waikar
Arvind Kejriwal : आंबेडकर वादात केजरीवालांचा नवा डाव; आता नितीश कुमार, चंद्राबाबू काय करणार?

कीर्तिकरांच्या ही याचिका आज मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे कीर्तिकारांना मोठा धक्का बसला असून वायकरांना दिलासा मिळाला आहे. वायकर यांची खासदारकी शाबूत राहणार असल्याचे आज स्पष्ट झाले. आता कीर्तिकर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून पुन्हा वायकरांच्या विजयाला आव्हान देणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, कीर्तिकर यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते की, निवडणूक आयोगाला मोकळ्या आणि पारदर्शक वातावरणात निवडणुकीचे व मतमोजणीचे काम करण्यात अपयश आले आहे. सातत्याने विजयाच्या दिशेने अग्रक्रमावर असलेले कीर्तिकर यांना विजयी घोषित करण्यात आल्यानंतर पोस्टल बॅलेटची पुनर्मोजणी करण्याची मागणी रविंद्र वायकर यांच्यातर्फे करण्यात आली आणि विविध घडामोडींचा शेवट अचानक रविंद्र वायकर 48 मतांनी विजयी होण्यात झाला.

Amol Kirtikar, Ravindra Waikar
Local Body Election : नव्या वर्षात उडणार गावगाड्यांचा बार, प्रशासनाकडून निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू

याचिकेतून निवडणूक अधिकारी कार्यालयात तात्पुरत्या सेवेत असलेल्या दिनेश गुरव या व्यक्तीचा मोबाईल फोन प्राजक्ता वायकर – महाले आणि नंतर मंगेश पांडिलकर यांनी मतमोजणीच्या वेळी व मतमोजणी सुरू असलेल्या ठिकाणी वापरण्यावर मुख्यतः आक्षेप घेतलेला आहे. निवडणूक अधिकारी कार्यालयात दिनेश गुरव या व्यक्तीची तात्पुरती झालेली नेमणूक योग्य आहे का?, असा याचिकेत करण्यात आला होता.

अशाप्रकारे खासगी कंपनीतील एखाद्या व्यक्तीची तात्पुरती नेमणूक होऊ शकते का?, निवडणूक आयोगासोबत कार्यरत कोणतीही व्यक्ति मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल फोन घेऊन जाऊ शकतात का? असे प्रश्न उपस्थित करून निवडणूक रिटरनिंग अधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्यापासून केवळ दोन फुटांच्या अंतरावर प्राजक्ता वायकर- महाले मोबाईल वापरताना त्यांनी आक्षेप का घेतला नाही असे प्रश्न उपास्थित करण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com