Pratapsingh Patil: तीन भाचे आमदार, भाचे जावईही आमदार; प्रतापसिंह पाटलांच्या विजयाने राजन पाटील चर्चेत!

Rajan Patil Political Family News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रतापसिंह पाटील यांच्या विजयामुळे राजन पाटील यांच्या परिवारातील आमदारांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
Rajan Patil Political Family News
Rajan Patil Political Family NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra MLC Election Result 2026: विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रतापसिंह पाटील यांनी मिळवलेल्या विजयाची चर्चा सुरू असतानाच माजी आमदार राजन पाटील यांच्या राजकीय परिवाराकडेही सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

राजन पाटील यांचे तीन भाचे आमदार असून, त्यांच्या कुटुंबाशी संबंधित भाचे जावई राजेश विटेकर हेही आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या परिवारातील चार आमदारांची राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांतील पाच जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक विशेष लक्षवेधी ठरली. या मतदारसंघातून प्रतापसिंह पाटील यांनी बाजी मारली.

विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांच्याविरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती. चव्हाण यांनीही विजयासाठी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र, पदवीधर मतदारांनी प्रतापसिंह पाटील यांच्या बाजूने कौल दिला.

राजन पाटलांचे तीन भाचे आमदार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रतापसिंह पाटील यांच्या विजयामुळे राजन पाटील यांच्या परिवारातील आमदारांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. प्रतापसिंह पाटील हे राजन पाटील यांचे भाचे आहेत. यापूर्वीच त्यांचे दोन भाचे आमदार म्हणून कार्यरत आहेत. आता प्रतापसिंह पाटील यांच्या विजयामुळे या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे.

Rajan Patil Political Family News
MLC Election 2026 Result: पराभव जिव्हारी लागला अन् शिक्षकांची लायकी काढली! ‘जशी लायकी तसा प्रतिनिधी!’; श्रीकांत देशपांडे यांचा हल्लाबोल

विजयसिंह पंडित हे गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. तर राहुल पाटील हे परभणी जिल्ह्यातून तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. या दोघांनंतर आता प्रतापसिंह पाटील यांचीही आमदार म्हणून विधानमंडळातील उपस्थिती असेल. त्यामुळे राजन पाटील यांच्या तीन भाच्यांकडे आमदारकी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

Rajan Patil Political Family News
DA Hike 2026: केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! DA मध्ये 3% वाढ, चार महिन्यांची थकबाकी किती मिळणार? पगारात किती वाढ होणार?

भाचे जावई राजेश विटेकरही आमदार

राजन पाटील यांच्या कुटुंबाशी संबंधित आणखी एक नाव म्हणजे राजेश विटेकर. राजन पाटील यांच्या बहिणीच्या मुलीचे पती राजेश विटेकर आहेत. त्यामुळे ते राजन पाटील यांचे भाचे जावई ठरतात. विटेकर हेही आमदार असल्याने राजन पाटील यांच्या परिवाराशी नातेसंबंध असलेल्या आमदारांची संख्या चारवर पोहोचते.

Rajan Patil Political Family News
MLC Election Result 2026: रील्स पाहायचाही संयम नाही; मग बॅलेट पेपरच्या निकालासाठी वाट बघण्याची तयारी आहे का? शिक्षक-पदवीधर मतमोजणीने दाखवला आरसा

निवडणुकीतील विजयाने चर्चेला नवे वळण

छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात सतीश चव्हाण हे विद्यमान आमदार असल्याने त्यांची स्थिती मजबूत मानली जात होती. त्यांनी निवडणुकीत पूर्ण ताकद लावली होती. मात्र, प्रतापसिंह पाटील यांनी विजय मिळवत राजकीय समीकरणांना नवे वळण दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com