Loksabha Election 2024 : संजय राठोडांच्या उमेदवारीबाबत प्रश्न अन् चित्रा वाघ संतापल्या; म्हणाल्या...

Chitra Wagh Vs Sanjay Rathod : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून मंत्री संजय राठोड यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
Chitra Wagh Sanjay Rathod
Chitra Wagh Sanjay RathodSarkarnama
Published on
Updated on

आगामी महिन्यांमध्ये पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ( Loksabhe Election 2024 ) महायुतीकडून जागांची चाचपणी सुरू आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून मंत्री संजय राठोड यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. पण, संजय राठोड यांच्या उमेदवारीला भाजप नेत्या, चित्रा वाघ यांनी विरोध दर्शवला आहे.

Chitra Wagh Sanjay Rathod
Lok Sabha Election 2024 : यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून ठाकरेंचा उमेदवार ठरला

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेमधील भावना गवळी ( Bhavana Gawali ) या विद्यमान खासदार आहेत. गवळींऐवजी मंत्री संजय राठोडांच्या नावाची लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार चर्चा सुरू आहे. यातच चित्रा वाघ यवतमाळ दौऱ्यावर होत्या. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संजय राठोडांच्या लोकसभा उमेदवारीबाबत प्रश्न विचारल्यावर चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या. तसेच, महाविकास आघाडीनं राठोडांना क्लीन चिट दिल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला.

"राठोड निरापराध असल्याची चिठ्ठी मी दिली नव्हती"

राठोडांचा एकेरी उल्लेख करत चित्रा वाघ म्हणाल्या, "त्याला आधीच्या सरकारनं मंत्री केलं. तसेच, त्या प्रकरणात ( पूजा चव्हाण ) महाविकास आघाडीनं त्यांना क्लीन चिट दिली होती. सरकार ही फार मोठी यंत्रणा आहे. राठोड निरापराध असल्याची चिठ्ठी मी दिली नव्हती."

Chitra Wagh Sanjay Rathod
Congress News : काँग्रेसला धक्क्यांवर धक्के, पक्षाला वेगळ्या नेतृत्वाची गरज?

"उमेदवारीबाबत अद्याप कुठलीही चर्चा नाही, पण..."

लोकसभेला राठोडांच्या नावाची महायुतीकडून चाचपणी सुरू आहे, याला विरोध राहणार का? असा प्रश्न विचारल्यावर चित्रा वाघ यांनी म्हटलं, "हा प्रश्न चुकीचा आहे. हा माझा विषय नाही. पक्षाचा झेंडा घेऊन काम करणं, हा माझा विषय आहे. उमेदवारीबाबत अद्याप कुठलीही चर्चा नाही. पण, तेव्हाही माझा राठोडांना विरोध होता आणि पुढंही असेल."

Chitra Wagh Sanjay Rathod
Bhujbal Vs Jarange : "जरांगे, खरा पाटील असशील तर..." ; भुजबळांनी पुन्हा ललकारले!

पूजा चव्हाण प्रकरण काय?

7 फेब्रुवारीला 2021 मध्ये पूजा चव्हाण या तरूणीनं पुण्यात आत्महत्या केली होती. चव्हाणच्या आत्महत्येप्रकरणी यवतमाळचे आमदार संजय राठोड दोषी असल्याचा ठपका तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठेवला होता. यानंतर संजय राठोडांना मंत्रीपद गमवावं लागलं होतं. तर, महाविकास आघाडीचं सरकार असतानाच संजय राठोडांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिली होती. जून-जुलै 2022 मध्ये एकनाथ शिंदे आणि भाजप सरकार आलं. या सरकारमध्ये संजय राठोडांना मंत्रीपदही देण्यात आलं आहे.

Chitra Wagh Sanjay Rathod
Ncp News : किनवट मतदारसंघात 'तुम्ही बांधाल ते तोरण..; प्रदीप नाईकांचा गड शाबूत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com