CJP Impact: सीजेपीचा मोठा इम्पॅक्ट! राज्य शासनाला लावलं कामाला, शाळा सुधारण्यासाठी मोठ्या अभियानाची झाली घोषणा; दिपके, म्हणाले...

CJP Impact: महाराष्ट्र शासनानं आता राज्यातील शासकीय शाळांची अवस्था सुधारण्यासाठी अभियान हाती घेतली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी याची घोषणा केली.
Abhijeet Dipke_Maharashtra Schools
Abhijeet Dipke_Maharashtra Schools
Published on
Updated on

CJP Impact: महाराष्ट्र शासनानं आता राज्यातील शासकीय शाळांची अवस्था सुधारण्यासाठी अभियान हाती घेतली आहे. 'चला शाळेला जाऊया' या नावानं हे अभियानं चालवलं जाणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नुकतीच याची घोषणा केली. यानंतर आता कॉक्रोच जनता पार्टी या दबाव गटाचे समन्वयक अभिजीत दिपके यांनी यावरुन मोठा दावा केला आहे. पण सीजेपीनं १५ ऑगस्टपासून सुरु केलेल्या शाळा तपासणी मोहिमेचं हे यश मानलं जात आहे.

'चला शाळेला जाऊया' अभियान काय?

राज्यातील प्रत्येक शाळेत स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण आणि विद्यार्थीकेंद्रित वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळांमध्ये भेट देऊन काम करावं. बैठका आणि आढाव्यांमधील नियोजनाचे प्रतिबिंब शाळांमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये दिसलं पाहिजे. यासाठी राज्यभर ‘चला शाळेत जाऊया’ हे विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी नुकतीच केली. शिक्षणाशिवाय पर्याय नाही, त्यामुळं ‘ज्ञानमंदिरांचं सशक्तीकरण’ ही सामुहिक जबाबदारी असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. ५ सप्टेंबर २०२६ (शिक्षक दिन) ते २० ऑक्टोबर २०२६ (दसरा) पर्यंत हे अभियान राबवलं जाणार आहे.

Abhijeet Dipke_Maharashtra Schools
'Old Monk'ला हायकोर्टाचा पुन्हा झटका! महाराष्ट्रात 'रम'वरील बंदी कायम राहणार; FSSAIनं नेमका कशावर घेतला आक्षेप?

शाळांमधील मूलभूत सुविधांबाबत शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले, "शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छ स्वच्छतागृहे, सुरक्षित इमारती आणि स्वच्छ परिसर यांना प्रथम प्राधान्य दिले गेले पाहिजे. काही कामांसाठी मोठ्या निधीची आवश्यकता असली तरी अनेक सुधारणा लोकसहभागातून आणि स्थानिक पातळीवरील पुढाकारातून तातडीने करता येऊ शकतात. शाळांची रंगरंगोटी, स्वच्छता आणि परिसर सुशोभीकरणासाठी समाजाचा सहभाग घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं.

पोषण आहार, शालेय गणवेश आणि विद्यार्थ्यांच्या सुविधांबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नसल्याचं स्पष्ट करत मंत्री भुसे यांनी निकृष्ट दर्जाचा पुरवठा किंवा अनियमितता आढळल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित बाबींमध्ये गुणवत्ता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रभावी निरीक्षण व्यवस्था उभी करावी, असे त्यांनी सांगितलं. यावेळी प्रधान सचिव देओल यांनी शाळा भेटीसाठी जाताना सर्व अधिकाऱ्यांनी अधिकाधिक शाळांना भेट देण्याचे नियोजन करावं, तसंच शाळा तपासणी दरम्यान सर्व संबंधित माहिती सोबत बाळगावी अशी सूचना केली.

Abhijeet Dipke_Maharashtra Schools
Swatantra Bhardwaj: स्वतंत्र भारद्वाज दिल्ली पोलिसांच्या ताब्यात! पॉक्सो, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; अटकेविरोधात हिंदू संघटना उतरल्या रस्त्यावर

अभिजीत दिपकेंचा मोठा दावा

दरम्यान, शासनानं सुरु केलेल्या या अभियानावर कॉक्रोच जनता पार्टीचे समन्वयक अभिजीत दिपके यांनी मोठा दावा केला आहे. मोठा विजय! असं म्हणतं त्यांनी दावा केला की, राजस्थान आणि उत्तर प्रदेश आता महाराष्ट्र शासनानं शाळांची अवस्था आणि शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र शासनानं सुरु केलेला 'चला शाळेत जाऊया अभियान' ही आमची महत्वाची अचिव्हमेंट आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com