Swatantra Bhardwaj: स्वतंत्र भारद्वाज दिल्ली पोलिसांच्या ताब्यात! पॉक्सो, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; अटकेविरोधात हिंदू संघटना उतरल्या रस्त्यावर

Swatantra Bhardwaj: ज्या स्वतंत्र भारद्वाजनं आपल्या वडिलांना मारहाण केली, त्याला अटक झाल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी भूमिका निशू आझाद हीनं घेतली आहे.
Swatanrya Bhardwaj Support Hindu Organisations
Swatanrya Bhardwaj Support Hindu Organisations
Published on
Updated on

Swatantra Bhardwaj Arrested : दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर सुरु असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान, २० जुलै २०२६ रोजी संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावर दिल्लीवर पोलिसांनी अमानुषपणे विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. याच आंदोलनात निशू आझाद नावाच्या एका दलित विद्यार्थीनीचे वडीलही मुलांना पाठिंबा देण्यासाठी सहभागी झाले होते. यावेळी त्यांना एका स्वतंत्र भारद्वाज नावाच्या तरुणानं पोलिसांच्या लाठीनं डोक्यात मारहाण केली होती. त्यामुळं त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. या मारहाणीचं या भारद्वाजनं नुकतंच एका पॉडकास्टमध्ये खुलं समर्थनही केलं होतं. यानंतर हे प्रकरण तापलं असून आता या भारद्वाजच्या अटकेच्या मागणीसाठी तरुणाई पुन्हा रस्त्यावर उतरली आहे. पण या स्वतंत्र भारद्वाजच्या समर्थनार्थ आणि त्याच्या संभाव्य अटकेविरोधात आता हिंदू संघटनाही रस्त्यावर उतरल्या आहेत.

नेमका विषय काय?

निशू आझाद या विद्यार्थीनीनं नुकतंच सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत गुंड प्रवृत्तीच्या सोशल मीडिया इन्स्फ्लुएन्सर स्वतंत्र भारद्वाजनं आपल्या वडिलांना कशी अमानुष मारहाण केली याची आपबिती सांगितली. यानंतर स्वतंत्र भारद्वाज याचा पॉडकास्टमधील मुलाखत व्हायरल झाली. यामध्ये त्यानं आपल्याला दिल्ली पोलिसांनी आपल्याला लाठी देऊन खुलेआम मारहाण करण्यासाठी परवानगी दिल्याचं सांगितलं आहे. पॉडकास्टमध्ये बोलताना आपण निशू आझादचे वडील संजय कुमार यांच्या डोक्यात जोरदार काठीनं प्रहार करुन त्यांचं डोकं फोडलं. त्या माणसाच्या डोक्यात ७ टाके पडले. पण माझं कोणीही काहीही वाकडं करु शकलं नाही, असंही त्यानं म्हटलं आहे.

एका रात्रीतच माझी पोलिसांच्या ताब्यातून सुटका झाली. त्या दिवशी रात्रभर दिल्लीच्या रस्त्यांवर मोकळा फिरत होतो. यावेळी त्यानं केंद्र सरकारमधील अनेक मंत्र्यांची नाव घेत हे आपला बडे भाई असल्याचं तो अभिमानं सांगत होता. दिल्ली पोलिसांचे अधिकारी देखील आपले ओळखीचे आहेत. यामध्ये त्यानं पंतप्रधान देखील आपले भाऊ असल्याची फुशारकी मारली. माझ्या पायतले शूज हे दिल्ली पोलिसांचे आहेत, हातातली काठी देखील दिल्ली पोलिसांचीच होती. मी एनसीसीमध्ये मिलिटरी ट्रेनिंग घेतलेलं आहे, त्यामुळं आपल्यासाठी या मारहाणीच्या आणि पळून जाण्याच्या गोष्टी अवघड नाहीत, अशा स्वरुपाच्या बाता देखील हा स्वतंत्र भारद्वाज संबंधित पॉडकास्टमध्ये मारत होता.

Swatanrya Bhardwaj Support Hindu Organisations
Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांचे 'रोल मॉडेल' डॉ. यशवंत ओक कोण आहेत? त्यांच्या लाऊडस्पीकर विरोधी लढ्यातून निर्माण झाला महत्वाचा कायदा

राहुल गांधी, चंद्रशेखर आझाद यांना आवाहन

त्याचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आणि निशू आझाद या विद्यार्थीनीनं याबाबत राहुल गांधी आणि खासदार चंद्रशेखर आझाद त्याचबरोबर कॉक्रोच जनता पार्टीला आवाहन केल्यानंतर हे प्रकरण आता पेटलं असून या सर्वांनी या विद्यार्थीनीची भेट घेऊन तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. तसंच पुन्हा जेनझी मंडळी आया निशू आझादच्या वडिलांच्या मारहणीच्या निषेधार्थ आणि स्वतंत्र भारद्वाज नावाच्या गुंडाच्याविरोधात रस्त्यावर उतरली होती.

Swatanrya Bhardwaj Support Hindu Organisations
BJP Vs shivsena : भाजप नगरसेवकाला नगरपरिषदेच्या पायऱ्यांवरून धक्का, 'टक्केवारी'च्या आरोपाने खळबळ

हिंदू संघटना उतरल्या रस्त्यावर

त्यानंतर दिल्ली पोलिसांनी या स्वतंत्र भारद्वाजला बुलंदशहर इथून ताब्यात घेतलं असून त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण आता गुंड प्रवृत्तीच्या स्वतंत्र भारद्वाजच्या समर्थनार्थ हिंदू संघटना दिल्लीच्या रस्त्यावर उतरल्या आहेत. भारद्वाजला अटक केली जाऊ नये यासाठी त्यांनी हा मोर्चा काढला आहे. हातात स्वतंत्र भारद्वाजचे पोस्टर घेऊन हे मोर्चेकरी रस्त्यावर उतरले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com