Kunal Kamara : गद्दार कोण जनतेनं दाखवलंय, कामराने माफी मागितलीच पाहिजे...; CM फडणवीसांचाही आक्रमक पवित्रा

Kunal Kamara : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या व्यंगात्मक गाण्याचा निषेध केला
Devendra Fadnavis, Eknath Shinde
Devendra Fadnavis, Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Kunal Kamara News : गद्दार कोण हे जनतेनं दाखवून दिलं आहे. त्यामुळे कुणाल कामरा याने माफी मागितलीच पाहिजे, तो राहुल गांधी दाखवत असलेलं संविधान हातात घेऊन लपू शकत नाही, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या व्यंगात्मक गाण्याचा निषेध केला आहे.

कुणाल कामरा याने आपल्या स्टँडअप काॅमेडी शोमध्ये एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली. तो म्हणाला की, आधी भाजपमधून शिवसेना फुटली. त्यानंतर शिवसेनेतून शिवसेना फूटली. नंतर राष्ट्रवादीमधून राष्ट्रवादी फूटली. एका मतदाराला नऊ बटणं दिली. चालू ज्यांनी केले होते ते ठाणे जिल्ह्यातून येतात, असे म्हणत कुणालने आपले व्यंगात्मक गाणं सादरं केलं.

Devendra Fadnavis, Eknath Shinde
Kunal Kamara : फडणवीसांना कमजोर करण्याचा शिंदेंचा आणखी एक प्रयत्न : आदित्य ठाकरेंनी टाकली काडी

'ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी' असे बोल या गाण्याचे होते. यात गुवाहटी, गद्दारी असे बोलही होते. हे गाणे सोशल मिडीयावर व्हायरल होताच शिवसेना आक्रमक झाली आहे. कार्यकर्त्यांनी त्याच्या स्टुडिओची तोडफोड केली असून त्याच्यावर गुन्हाही दाखल केला आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनीही कामरा याने केलेले व्यंगात्मक गाणे चुकीचेच असल्याचे म्हंटले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे. पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही. कामराला हे माहित पाहिजे, की महाराष्ट्रातील जनतेने 2024 साली कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे दाखवून दिलयं. कोणाकडे स्वर्गीय हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विरासत गेली, हे जनतेने ठरवलेलं आहे.

अशा प्रकारची खालच्या दर्जाची कॉमेडी करुन आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते, ज्यांच्याबद्दल राज्यातील जनतेमध्ये आदर आहे, त्यांच्याविषयी अशा प्रकारचा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही. हे अत्यंत चुकीच आहे. तुम्ही जरुर कॉमेडी करा, व्यंग करा. पण अपमानित करण्यात काम कोणी करत असेल, तर ते सहन केलं जाणार नाही, असेही फडणवीस यांनी निक्षून सांगितले.

Devendra Fadnavis, Eknath Shinde
Kunal Kamra : कुणाल कामरा प्रकरण तापणार? "माफी मागा, अन्यथा तोंड काळे करू, चोप देऊ", शिवसेनेची धमकी

कामराने माफी मागितली पाहिजे. ते जे संविधानाच पुस्तक दाखवतात. त्या संविधानाची त्यांना माहिती असेल, त्यांनी वाचलं असेल, तर संविधानाने सांगितलय स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही. तुम्हाला दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करता येणार नाही. हे तेच संविधान आहे, जे राहुल गांधी दाखवतात, हे संविधान दाखवून तुम्ही लपू शकत नाही, त्यांनी माफी मागितली पाहिजे” अशी आमची मागणी आहे, देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com