Devendra Fadnavis statement : बोर्डीकर, शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर सीएम फडणवीसांचे मोठे विधान; म्हणाले, ' प्रत्येक गोष्टीचा आपण.... '

Bordikar, Shirsat controversy News : सरकारसमोरील अडचणी वाढत असतानाच मंत्री मेघना बोर्डीकर, मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर आता या सर्व प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे.
devendra fadnavis, meghna bordiakr, sanjay shirsat
devendra fadnavis, meghna bordiakr, sanjay shirsat Sarakrnama
Published on
Updated on

Mumbai News : पावसाळी अधिवेशनापासून सत्ताधारी मंडळींच्या वादग्रस्त वक्तव्ये व विविध कारनाम्यामुळे राज्यातील वातावरण चँगलेच ढवळून निघाले आहे. या सर्व वादग्रस्त वक्तव्यावरून महायुती सरकारला विरोधकांकडून घेरले जात आहे. त्यामुळे एकीकडे सरकारसमोरील अडचणी वाढत असतानाच मंत्री मेघना बोर्डीकर, मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर आता या सर्व प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay shirsat), मंत्री मेघना बोर्डीकर यांनी वादग्रस्त विधान केली असल्याची टीका विरोधकांनी करीत राज्य सरकारची कोंडी केली होती. त्यामुळे आता सीएम फडणवीस या वादग्रस्त विधाने करणाऱ्या मंडळींवर काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच त्यांनी मंत्री बोर्डीकर, शिरसाट यांना क्लीन चिट दिली आहे.

devendra fadnavis, meghna bordiakr, sanjay shirsat
Devendra fadnavis : कोकाटेंना दणका, तरीही मंत्री बिनधास्त; शिस्तप्रिय फडणवीसांनाच आव्हान...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, 'मंत्री भाषणामध्ये कधीकधी गमतीने देखील बोलतात, प्रत्येक गोष्टीचा बाऊ करु लागलो तर हे योग्य नाही. काही स्टेटमेंट महत्त्वाचे असतात तर काही चुकीची असतात, असे स्पष्ट केले. मंत्री शिरसाट आणि मंत्री बोर्डीकर यांच्या वक्तव्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

devendra fadnavis, meghna bordiakr, sanjay shirsat
RSS BJP Congress political clash : 'संघाचा विचार फुटीरतावादी'; श्यामाप्रसाद मुखर्जींच्या उपमुख्यमंत्रीपदाचा हर्षवर्धन सपकाळांनी 'इतिहास'च काढला

शिरसाट जे बोलले त्यांचे चुकीचं वाटत नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. मेघना बोर्डीकर सोबत बोलणं झालं आहे. त्यांचं बोलणं माध्यमांकडून अर्धवट दाखवण्यात येत असल्याचे फडणवीस म्हणाले. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा बाऊ करु नये, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले आहे.

devendra fadnavis, meghna bordiakr, sanjay shirsat
Raj Thackeray : दुबेंनी पुन्हा राज ठाकरेंना डिवचले; ट्विट करीत म्हणाले, 'हिंदी मीच...'

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ हे अकोल्यातील सामाजिक न्यायभवनाचे उद्घाटनासाठी शहरात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी केलेले एक विधान नवा वाद निर्माण करणारं ठरलं आहे. सामाजिक न्यायभवनाच्या वसतिगृहासाठी तुम्ही 5, 10 किंवा 15 कोटी अशी कितीही रक्कम मागा, आपण लगेच मंजूर करु. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय असं वादग्रस्त वक्तव्य शिरसाट यांनी केलं आहे.

devendra fadnavis, meghna bordiakr, sanjay shirsat
Mahayuti Politics : कोकाटेंना दणका बसताच शिंदेंचा मंत्री अलर्ट; योगेश कदमांकडून 'सावली बार'बाबत मोठा निर्णय!

मंत्री मेघना बोर्डीकर यांनी एका कार्यक्रमात ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी देतानाचा एक व्हिडिओ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला होता. या पार्श्वभूमीवर बोर्डीकर यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. रोहित पवार यांनी अर्धवट माहितीच्या आधारे राज्यातील जनतेची दिशाभूल करू नये. बोरी येथील विधवा,मोलमजुरी करणाऱ्या सामान्य महिलांचा पंतप्रधान आवास योजनेच्या लाभासाठी हा ग्रामसेवक छळ करतो, त्यांच्याकडे पैशांची मागणी करतो, अशी तक्रार होती. त्याची वारंवार तक्रार करूनही तो ऐकत नव्हता. त्या कार्यक्रमात काही महिला माझ्याकडे आल्या. त्यामुळे मी एक पालक या नात्याने ग्रामसेवकाला ज्या भाषेत कळते त्याच भाषेत समज दिली, असे मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.

devendra fadnavis, meghna bordiakr, sanjay shirsat
Friendship Day Special : अपराजित शरद पवारांनी पहिली निवडणूक माझ्याविरोधात जिंकली होती...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com