Raj Thackeray : दुबेंनी पुन्हा राज ठाकरेंना डिवचले; ट्विट करीत म्हणाले, 'हिंदी मीच...'

Hindi language controversy News : विशेष म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजप खासदार निशिकांत दुबे या दोघामध्ये सामना रंगला आहे. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
Raj Thackeray Vs Nishikant Dubey
Raj Thackeray Vs Nishikant Dubey sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : हिंदी सक्तीच्या विरोधात राज-उद्धव ठाकरे बंधू एकत्रित आल्यापासून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे बंधूनी हिंदी सक्तीला विरोध केला असल्याने गेल्या काही दिवसापासून हिंदी भाषिकांकडून त्यांना लक्ष्य केले जात आहे. विशेष म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजप खासदार निशिकांत दुबे या दोघामध्ये सामना रंगला आहे. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच आता परत एकदा दुबे यांनी ट्विट करीत राज ठाकरे यांना डिवचले आहे. त्यामुळे आता मनसेकडून दुबे यांना कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाते, याकडे लक्ष लागले आहे.

मुंबईतील मेळाव्याप्रसंगी राज ठाकरे (Raj thackeray) यांनी निशिकांत दुबेवर टीका केली होती. त्यावेळी त्यांनी ‘दुबे को डुबे-डुबे के मारेंगे’ असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना दुबे यांनी मी राज ठाकरे यांना हिंदी शिकवलीच असे ट्विट करीत डिवचले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Raj Thackeray Vs Nishikant Dubey
Solapur Shivsena : सोलापुरात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शहर समन्वयक, उपजिल्हाप्रमुखांसह 11 पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

महाराष्ट्र आणि मुंबईच्या जडणघडणीमध्ये उत्तर प्रदेश, बिहार आणि हिंदी भाषिक लोकांचं देखील मोठं योगदान राहिलं आहे. आणि आज देखील तुमची जी अर्थव्यवस्था आहे. त्या अर्थव्यवस्थेत आम्ही देखील योगदान देत आहोत. आम्ही असा दावा नाही करत की फक्त आम्हीच अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देत आहोत. मात्र आम्ही पण त्यामध्ये भर घालत आहोत, असे म्हटले आहे.

Raj Thackeray Vs Nishikant Dubey
BJP Politics : 'महात्मा गांधी चौकाचे नाव बदलून स्वतःच्या आईचे...', भाजप आमदाराच्या प्रस्तावाने खळबळ, काँग्रेस आक्रमक!

तुम्ही कोणत्या आधारे मारहाण करत आहात? इंग्रजी बोलताना कोणालाच काही समस्या वाटत नाही, इंग्रजी बोलायला तुम्ही कधीपासून सुरू केली? इंग्रज जेव्हा भारतात आले असतील 1760-65 च्या दरम्यान तेव्हापासूनच इथे इंग्रजी बोलली जाऊ लागली. मात्र यापूर्वी येथे कोणी इंग्रजी बोलत नव्हते. जेव्हा -जेव्हा मुंबई महापालिकेची निवडणूक असते, तेव्हा-तेव्हा मनसे आणि जेव्हा मनसे पक्ष नव्हता त्यापूर्वी शिवसेना (Shivsena) हेच काम करत होते.

Raj Thackeray Vs Nishikant Dubey
NCP SP News : "गद्दारी केलेल्या एक एकाला घरी पाठवणार"; अ‍ॅक्टिव्ह होताच शरद पवारांची वाघिण कडाडली!

सर्वात मोठे कन्फ्यूजन हे आहे, ते म्हणजे मुंबईमध्ये केवळ 30 टक्के लोकच मराठी बोलतात. बारा टक्के लोक उर्दु बोलतात, म्हणजे ते मुस्लिम आहेत. मराठी इतकेच म्हणजे 30 टक्के लोक हिंदी भाषा बोलतात. अडीच टक्के लोक राजस्थानी बोलतात, त्याचप्रमाणे काही लोक गुजराती बोलतात, भोजपुरी बोलतात त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं हे भाषेवरच राजकारण आहे, ते यावेळी पूर्णपणे फसणार आहे, असे दुबे यांनी म्हटले आहे.

Raj Thackeray Vs Nishikant Dubey
Raj-uddhav Thackeray brothers alliance : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मविआचे काय होणार? माजी मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान

राज व उद्धव ठाकरे यांचे ते एक पैसा कमावण्याचे साधन आहे, ते जेव्हा संपेल तेव्हा सगळेच त्यांच्यांविरोधात मतदान करतील, तेव्हा त्यांना अशाप्रकारचे राजकारण करण्याची संधी मिळणार नाही, असेही दुबे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे येत्या काळात वातावरण तापण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आल्याने राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता दुबे यांनी केलेल्या टीकेला मनसेकडून काय प्रत्यत्तर दिले जाते, याकडे लक्ष लागले आहे.

Raj Thackeray Vs Nishikant Dubey
MVA on fadnavis News : फडणवीसांचं कौतुक ते ही कुणी-कुणी करावं ? राऊत, अंधारे, कोल्हेनंतर अन् आता...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com