Nagpur News : नागपूर येथे होत आलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा रविवारी शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या समारोपावेळी नेमका विरोधकांनी गदारोळ केला. सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवेदन मांडत असताना विरोधकांनी विदर्भाला काय दिले या मुद्द्यावरुन गोंधळ केला. त्यावेळी सत्ताधारी मंडळींनीही त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकारानंतर देवेंद्र फडणवीसांनी तीव्र संताप व्यक्त केला. गदारोळ वाढत असल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन वेळा खाली बसा, खाली बसा असे सांगून असे काम होत नाही असे बजावले. मात्र, विरोधक ऐकत नसल्याचे पाहून सीएम फडणवीस यांनी भर सभागृहातच खडसावले.
रविवारी दुपारी सभागृहात सीएम देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे अंतिम आठवड्यातील निवेदन मांडण्यासाठी उठून उभे राहिले असताना विरोधी पक्षाच्या आमदारांनी गदारोळ करण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा या आमदारांची अनेक जणांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतप्त झालेल्या फडणवीसांनी यावेळी सुनावले. “तुम्ही पहिल्यांदा निवडून आलेले आहात. तुम्हाला या सभागृहाची शिस्त माहिती नाही. या सभागृहाचा डेकोरमही माहिती नाही.” अशा शब्दांत त्यांनी गदारोळ करणाऱ्या एका आमदाराला खडसावले.
'या सभागृहात जेव्हा मुख्यमंत्री किंवा सभागृहाचे नेते बोलतात, ती एक शिस्त असते. मी जर तुलनात्मक बोलायला लागलो की मागच्या काळात विदर्भाला काय मिळाले आणि आता काय मिळाले, तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे नाही, लक्षात ठेवा.', असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यापूर्वीच गदारोळ वाढत असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दोन वेळा खाली बसा, खाली बसा असे सांगून असे काम होत नाही, असे विरोधकांना खडे बोल सुनावले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहील. तसेच सीबीएसई अभ्यासक्रमात 21 पानांचा शिवरायांचा इतिहास समाविष्ट करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे व्हिजन डॉक्युमेंट तयार केले आहे. यात 2047 पर्यंत विकसित महाराष्ट्र कसा असेल याबद्दल प्रत्येक विभागाचा रोडमॅप आहे. त्याचे 2030, 2035 आणि 2047 असे तीन टप्पे आहेत. 2029-2030 मध्ये देशातील पहिली ट्रिलियन अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची असेल. त्या दृष्टीने आपले कार्य सुरु आहे, असे मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्याच्या विकासाचा रोडमॅप सादर करताना स्पष्ट केले.
लाडकी बहीण योजना पाच वर्ष सुरु राहणार
राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांना मोफत वीज योजना यापैकी कोणतीही योजना बंद केलेली नाही. सर्व योजना सुरु आहेत. यापुढेही पुढील 5 वर्ष ही योजना सुरुच राहणार आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांकडून केल्या जात असलेल्या टीकेला उत्तर देताना स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.