Shivsena News : शिवसेनेच्या तंबूत भाजप अन् मनसे इच्छुकांची घुसखोरी,अर्जही घेतले! चार तासांत पाचशे फाॅर्म संपले

BJP aspirants News : पहिल्याच दिवशी 536 जणांनी तिकिटासाठी अर्ज खरेदी केले. सोमवारी या सर्व इच्छूकांच्या मुलाखती होणार असून त्यानंतर नावांची निश्चिती केली जाणार आहे.
Shivsena program
Shivsena program Sarakarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेने आजपासून अर्ज वाटपाला सुरुवात केली. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी शिवसेनेच्या तंबूत शिरत चक्क भाजप अन् मनसेच्या काही कार्यकर्त्यांनीही अर्ज नेले. पहिल्याच दिवशी 536 जणांनी तिकिटासाठी अर्ज खरेदी केले. सोमवारी या सर्व इच्छूकांच्या मुलाखती होणार असून त्यानंतर नावांची निश्चिती केली जाणार आहे.

गेल्या आठवड्यात भाजपने (BJP) इच्छूकांकडून फॉर्म घेतले. तेथे इच्छूकांची संख्या हजाराच्या आसपास होती. त्यानंतरच्या काळात राजकीय हालचाली झाल्याने दोन्ही पक्षांनी स्वबळाची उबळ रोखून धरत समन्वयाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यातच शुक्रवारी (ता. 12) शिवसेनेने इच्छूकांना अर्ज वाटप सुरु केले. दुपारी 12 ते 5 या वेळात म्हणजे 4 तासांत एकूण 536 जण अर्ज घेऊन गेले. त्यात भाजप आणि मनसेचेही काही कार्यकर्ते होते.

Shivsena program
Shivraj Patil : अख्खं आयुष्य काँग्रेसला वाहिलेल्या शिवराज पाटलांनी पीएम मोदींकडे व्यक्त केली होती 'ती' इच्छा; पण आता अपूर्णच राहणार!

अर्ज घेऊन जाणाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण पश्चिम मतदारसंघातील इच्छूकांचे होते, त्या खालोखाल मध्य मतदार संघातील इच्छूकांनी अर्ज नेले. पूर्व मतदार संघात तुलनेने कमी प्रतिसाद लाभल्याचे शिवसेनेतील (Shivsena) सूत्रांनी सांगितले. शिवसेनेत शहरात दोन आमदारांच्या नेतृत्वात दोन गट आहे. पालकमंत्री संजय शिरसाट पश्चिमचे आमदार आहेत तर प्रदीप जैस्वाल मध्य मतदार संघाचे आमदार आहेत. या दोन्ही नेत्यांचे एकमेकांशी फारसे सख्य नसले तरी त्या त्या मतदारसंघातील इच्छूक त्यांच्या जोरावर तिकीट मागत असल्याचे स्पष्ट जाणवले.

Shivsena program
Pune BJP: पुणे महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी भाजपतर्फे तब्बल 2 हजार 350 इच्छुकांची तयारी; उद्यापासून धडधड वाढणार

दुसरीकडे, नागपुरात शिरसाट-जंजाळ वादावर तोडगा निघाल्यानंतर शिवसेनेत समन्वय समिती स्थापन झाली असून त्यात पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश जैस्वाल यांचा समावेश आहे. ही समन्वय समिती महापालिका निवडणुकीत पक्षात समन्वय ठेवण्याचे व नंतर भाजपसोबत जागावाटपाचे काम पाहणार आहे.

Shivsena program
Pune NCP : महापालिका निवडणुकीसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचं टार्गेट लाडकी बहीण नव्हे तर 'Gen Z'

अर्जवाटपाच्या वेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश जैस्वाल, नंदकुमार घोडेले, अशोक पटवर्धन, विकास जैन, हर्षदा शिरसाट आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेचे हे अर्ज वाटप उद्या (ता. 13) देखील सुरु राहणार असून सोमवारी (ता. 15) समन्वय समिती इच्छूकांच्या मुलाखती घेणार आहे.

Shivsena program
Congress president news : भाजपला अध्यक्ष सापडेनात, आता काँग्रेसमध्येही खळबळ; मल्लिकार्जून खर्गेंबाबत आमदाराचा ‘लेटरबॉम्ब’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com