CJP Split News : अवघ्या चार महिन्यात 'कॉक्रोच जनता पार्टी'त मोठी फूट; नवा पक्ष स्थापन करत दिले थेट आव्हान!

CJP Democratic News : अभिजित दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टीची कार्यकारिणी निवडली होती. मात्र, गुरुवारी सीजेपी पक्षात मोठी फूट पडली असून मूळ आंदोलनाशी जोडलेल्या कार्यकर्त्यांनी वेगळी चूल मांडली आहे.
CJP Abhijeet Dipke
CJP Abhijeet DipkeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : चार महिन्यापूर्वी स्थापन झालेल्या कॉकरोच जनता पार्टीने अभिजीत दिपकेच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर केंद्रीय शिखरं मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता. महिनाभर सुरु असलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाले होते. दिल्लीत मोठ्या प्रमाणात युवकाची ताकद दिपके यांनी दाखवली होती. आन्दोलन करणाऱ्या युवकावर मोठ्या प्रमाणात लाठीमार करण्यात आल्याने विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्याला घेरले होते. त्यानंतर अभिजित दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टीची कार्यकारिणी निवडली होती. मात्र, गुरुवारी सीजेपी पक्षात मोठी फूट पडली असून मूळ आंदोलनाशी जोडलेल्या कार्यकर्त्यांनी वेगळी चूल मांडली आहे.

'कॉकरोच जनता पार्टी' ही आता पूर्णपणे अरविंद केजरीवाल यांची पार्टी बनली आहे, असा गंभीर आरोप करत मनीष ब्रह्मभट्ट नावाच्या युवकाने गुरुवारी 'कॉकरोच जनता पार्टी डेमोक्रेटिक' (CJP Democratic) स्थापनेची घोषणा केली. त्यामुळे चार महिन्यापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या पक्षात मोठी फूट पडल्याचे पुढे आले आहे.

सीजेपी आंदोलनानंतर सर्व काही विकले गेले असून केवळ 'टीम केजरीवाल' बनून राहिली आहे. त्यासोबतच दिपकेने आपल्या टीममध्ये मित्र आणि मैत्रिणींचा भरणा केल्याचा आरोपही ब्रह्मभट्ट यांनी केला. अभिजीत दीपके यांनी घर बसल्या 12 लोकांची टीम तयार केली. यासाठी कोणत्याही मूळ कार्यकर्त्याला किंवा आंदोलनाशी जोडलेल्या लोकांना बोलावण्यात आले नाही. या पदांसाठी काय निकष लावले गेले? त्यांनी आम आदमी पार्टीशी जोडलेल्या आठ लोकांना, स्वतःच्या मैत्रिणींना आणि कॉलेजच्या मित्रांना यात जोडले आहे. अहमदाबादचे रहिवासी असलेले मनीष ब्रह्मभट्ट यांनी दिल्लीच्या जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करताना ब्रह्मभट्ट म्हणाले, ही टीम बनवण्याची मूळ कल्पना अरविंद केजरीवाल यांचीच होती. ते सुरुवातीपासूनच फसवणूक करत आले आहेत. जेव्हा अण्णा हजारे यांचे आंदोलन सुरू झाले, तेव्हा त्यांनी अण्णा हजारे यांचा वापर करून स्वतःचा राजकीय फायदा करून घेतला होता. आता पुन्हा एकदा उभारलेले आंदोलन यशस्वी झाल्यावर केजरीवाल यांनी अभिजीत दीपके यांच्यासोबत डील करून हे आंदोलन हायजॅक केले आहे.

CJP Abhijeet Dipke
Maharashtra Politics Live Update : 'आरोपींचे माझ्यासोबत फोटो असले म्हणजे मी गुन्हेगार होत नाही...'; गिरीश महाजन

मुस्लिम, शिख समाजाचा प्रतिनिधी नाही

सीजेपी पक्षात समाविष्ट करण्यासाठीच आपच्या मंडळींनी सर्व तडजोडी केल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला. सीजेपीच्या नव्या कार्यकारिणीत एकाही मुस्लिम पुरुषाला किंवा शिख प्रतिनिधीला स्थान देण्यात आले नाही, असा आरोप करत ब्रह्मभट्ट यांनी सीजेपीच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. या कारणांमुळेच गुरुवारी 'कॉकरोच जनता पार्टी डेमोक्रेटिक' (CJP Democratic) स्थापनेची घोषणा केली.

CJP Abhijeet Dipke
Maharashtra Politics Live Update : कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझे समर्थन नाही : मनोज जरांगे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com