Husain Dalwai : युपीचा राजकीय बुलडोझर महाराष्ट्रात? हुसेन दलवाईंचा आरोप

Husain Dalwai on Bulldozer action : शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. इथली परंपरा जातीयवादी नाही, तर एकोप्याची आहे. मी आग लावणारा माणूस नाही. आग विझवायला जाणारा माणूस असल्याचे दलवाई यांनी सांगितले.
Nagpur bulldozer actio
Nagpur bulldozer actiosarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नागपूरमधील दंगलीच्या मुख्य सूत्रधाराच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आल्याने मुस्लिमांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. कोर्टानेसुद्धा महापालिकेच्या कारवाईस अंतरित स्थगिती दिली आहे. यावरून उत्तर प्रदेशचे राजकारण महाराष्ट्रात आणले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सत्य शोधन समितीचे सदस्य हुसेन दलवाई यांनी केला आहे. तर विशिष्ट समाजासाठी बुलडोझर चालवल्या जात असल्याची शंका देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

मुंबईत अनेक अनधिकृत बिल्डिंग आणि बिल्डर आहेत. त्यांच्यावरही बुलडोझर चालवणार का असा सवाल दलवाई यांनी यावेळी उपस्थित करताना पोलिसांच्या भूमिकेवरसुद्धा ताशेरे ओढले आहेत. हिरवी चादर जाळली तेव्हा पोलिस काय करत होते? आंदोलनला परवानगी कशी दिली गेली असेही प्रश्न आता दलवाई यांनी उपस्थित केले आहेत.

नागपूरमध्ये ज्या भागात दंगे उसळले त्या भागात हुसेन दलवाई यांनी आज भेट दिली. अनेकांसोबत चर्चा केली. काही एनजीओ, पत्रकार, समाजसेवकांची त्यांनी भेट घेतली. नागपूरमध्ये घडलेला घटनाक्रम त्यांनी जाणून घेतला. यावेळी ते म्हणाले, यूपीचे द्वेषाचे राजकरण महाराष्ट्रात आणू नये. अनधिकृत बांधकामावर सुप्रीम कोर्टाचा नियमात राहून कारवाई करावी. ती फक्त ती विशिष्ट सामाजासाठी राहू नये.

Nagpur bulldozer actio
Nagpur riots Update : ''नागपूर दंगलीतील आरोपी फहीमच्या जामीनाबाबत म्हणणे सादर करा'' ; कोर्टाने पोलिसांना बजावली नोटीस!

ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे दंगे होता त्या ठिकाणी मी जात असतो. भेटी देऊन दोन्ही समाजात भाईचारा राहावा, शांतता राखावी यासाठी प्रयत्न करतो. आयात लिहलेली हिरवी चादर जाळण्यात आली, त्यामुळे हा दंगा भडकला असे आपणास समजले. अशा पद्धतीचे आंदोलनात पोलीस हस्तक्षेप करतात, जाळापोळ करायला कधीही परवानगी देत नाही.

त्यामुळे पोलिसांनी चादर जाळण्यास कशी काय परवानगी दिली असा सवाल हुसेन दलवाई यांनी उपस्थित केला. सरकार जाणीवपूर्वक काही लोकांना मदत करते. हे चुकीचे आहे. सकाळी ज्यांनी आंदोलन केले त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली नाही, ज्यांनी रात्री आंदोलन केले त्यांच्यावर गुन्हा दाखल केला याकडे दलवाई यांनी लक्ष वेधले.

Nagpur bulldozer actio
Nagpur Violence : 'फहीम खानला दणका दिलाच; आता शिवद्रोही कोरटकर व सोलापुरकरवर बुलडोजर चालवा!' राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी

महाराष्ट्रात अशा पद्धतीचे वातावरण कधीही नव्हते. महाराष्ट्रात नेहमीच दोन्ही धर्माचे एकोप्याचे नातं राहिलेले आहे. अनेक सणांमध्ये हिंदू मुस्लिम एकत्र येतात. गुढीपाडवा, राम नवमी असो वा ईद सर्व शांततेत होईल असा विश्वास आहे. यावेळ त्यांनी मुस्लिम धर्मीयांनीसुद्धा महात्मा गांधींच्या शांततेच्या मार्गाने प्रत्त्युतर देऊ शकले असते, असा सल्ला दिला. शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. इथली परंपरा जातीयवादी नाही, तर एकोप्याची आहे. मी आग लावणारा माणूस नाही. आग विझवायला जाणारा माणूस असल्याचे दलवाई यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com