
Nagpur News : नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीचा वाद टोकाला जाऊन दंगली झाली. या दंगलीच ठराविक घरांना लक्ष करून मोठे नुकसान करण्यात आले. तर हे ठकवून कट रचण्यात आल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तर या प्रकरणात अल्पसंख्याक लोकशाही पक्षाचे नेता फहीम खानच मास्टरमाईंड असल्याचे समोर आले होते. यानंतर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आज (ता.24) नागपूर महानगरपालिकेने त्याचे राहत्या घराचे बांधकाम बेकायदेशीर ठरवत त्याच्यावर बुलडोझर चालविला आहे. अशा पद्धतीने नागपूरमध्ये पहिल्यांद कारवाई झाल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यादरम्यान नवी मागणी समोर आली आहे.
नागपुरातील हिंसाचाराप्रकरणी मुख्यसूत्रधार फहीम खानच्या घरावर बुलडोझरची कारवाई करण्यात आली. त्याच्या घराचे बांधकाम बेकायदा असल्याची नोटीस महापालिकेकडून देण्यात आली होती. तर ते आज हटविण्याची कारवाई आज करण्यात आली. ही कारवाई फक्त 24 तासांच्या आत करण्यात आली आहे. यामुळे आता अशीच कारवाई शिवद्रोही कोरटकर व सोलापुरकरच्या घरावर करणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.
दरम्यान याचमुद्द्यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी सरकारचे अभिनंदन करणारे ट्विट केले आहे. यावेळी मिटकरी यांनी सरकारचे आभार आहेत. तसेच ज्या प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरने आपल्या शिवरायांवर गरळ ओकली त्याच्यांवरही अशी कारवाई करा, अशी मागणी केलीय. मिटकरी यांनी, शिवरायांवर गरळ ओकणाऱ्या कोरटकर आणि सोलापूरकरच्या वक्तव्यांची दखल घेत त्यांच्यांही बेकायदेशीर बाबींची चौकशी करावी. आणि त्यांच्याही मालमत्तेवर बुलडोझर चालवावा, अशी मागणी केली आहे.
दंगलीचा मास्टरमाईंड फहीम खान व खोक्या भोसलेच्या बेकायदेशीर घरावर कायदेशीर बुलडोजर चालवून धडा शिकविल्याबद्दल या सरकारचे आभार. आता कोरटकर व सोलापुरकर यांच्यावरही बुलडोजर चालवावे, असे म्हणत जनभावना असाही हॅश टॅग करत ट्विट केलं आहे.
दरम्यान दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दंगली प्रकरणावरून सूचक वक्तव्य केलं होतं. त्यांनी युपीच्या धर्तीवर कायदा आणू, 'कायद्याने परवानगी दिली तर बुलडोझर चालवू' असे म्हटलं होतं. त्यानंतरच नागपूरमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे बुलडोजर कारवाई केली जाणार अशी चर्चा रंगली होती. तोच आता फहीम खानची पत्नी जहिरुन्निसाच्या नावावर नोंदणीकृत असलेले घर बेकायदेशीर ठरवणारी नोटीस महापालिकेने बजावली. तर आज हे घर तोडण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.