Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना कोर्टाचा दणका! 'ती' दोन कागपत्रे ठरली महत्त्वाची, एकाच घरात राहून दोन मुलांना जन्म...

Dhananjay Munde alimony case court order : धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे या आपली पत्नी नसल्याचा दावा केल्याने कोर्टाने करुणा यांना लग्न झाल्याचे पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार करुणा शर्मा यांनी पुरावे दिले होते.
Dhananjay Munde Karuna Sharma
Dhananjay Munde Karuna Sharmasarkarnama
Published on
Updated on

Dhananjay Munde News : करुणा शर्मा यांच्यासोबत आपला विवाह झालेला नाही. आपण लिव्ह इनमध्ये राहत असल्याचा दावा कोर्टात माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केला होता. या प्रकरणी माझगाव कोर्टात सुनावणी सुरू होती. शर्मा यांच्याशी मुंडे यांचे संबंध प्रथमदर्शी लग्नासारखेच असल्याचे दिसते, असा निरीक्षण कोर्टाने नोंदवत मुंडेंना दिलास देण्यास नकार दिला. वांद्रे कोर्टाचा करुणा शर्मा यांना दरमहा दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश माझगाव कोर्टाने कायम ठेवला.

दोन मुलांना जन्म दिला हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही, असे निरीक्षणही माझगाव कोर्टाने नोंदवले. तसेच करुणा शर्मा यांच्या मुलीला दरमहा खर्चासाठी 75 हजार रुपये देण्याच आदेश दिले आहेत. धनंजय मुंडे हे राजकीय नेते आहेत त्यांच्या आर्थिकस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करता येणार नसल्याचे देखील कोर्टाने म्हटले.

Dhananjay Munde Karuna Sharma
Nagpur police stations : 'क्राईम सिटी'चा डाग पुसून काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात सहा नवीन पोलिस ठाणे!

धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे या आपली पत्नी नसल्याचा दावा केल्याने कोर्टाने करुणा यांना लग्न झाल्याचे पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार करुणा शर्मा यांनी पुरावे दिले होते. त्यामध्ये त्यांनी आपल्या मुलांचा जन्मदाखल, पासपोर्ट, तसेच वारसदार म्हणून धनंजय मुंडेंच्या पाॅलिसमध्ये नाव असलेले कागदपत्र सादर केली होती.धनंजय मुंडे यांचे इच्छापत्र आणि स्वीकृतीपत्र हे दोन कागदपत्रे महत्त्वाची ठरून या कागदपत्रांचे आधारे शर्मा आणि मुंडे यांच्या विवाहाचे नाते दिसते, असे कोर्टाने म्हटले.

करुणा शर्मा काय म्हणाल्या?

या निकालाबाबत करुणा प्रतिक्रिया देताना करुणा शर्मा यांनी न्यायालयाचे आभार मानले. त्या म्हणाले, आम्ही 27 वर्ष संसार केला. आम्हाला दोन मुलं आहेत. पण मंत्री, आमदारा झालो म्हणून कोणी हे कसं नाकरू शकतं. आमदार आहात म्हणून काहीही करु शकता का? माझ्याकडे त्यांच्याविषयी अनेक गोष्टी आहेत त्या देखील मी बाहेर काढणार आहे.

मुलांना स्वीकारले

धनंजय मुंडे यांनी याआधीच कोर्टामध्ये करुणा शर्मासोबत आपले लग्न झाले नाही मात्र दोन मुलं आपलीच असल्याचे सांगितले होते. तसेच मुलांच्या पालनपोषनाची जबाबदारी देखील स्वीकारली असल्याचे म्हटले होते. त्यावर मुलं हवीत मात्र मुलांची आई नको, अशी टीका देखील मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी केली होती.

Dhananjay Munde Karuna Sharma
PM Modi Nagpur Visit: दीक्षाभूमी,संघभूमी भेटीद्वारे PM मोदींनी साधलं सामाजिक संतुलन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com