Ajit Pawar News : शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना त्यावेळी महाविकास आघाडीमध्ये असलेले अजित पवार यांनी गद्दार म्हणून शिंदेंवर टीका केली होती. त्यावेळची त्यांची टीका कुणाल कामराच्या व्यंगात्मक गाण्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय राऊत यांनी देखील अजित पवारांनी शिंदेंवर गद्दार म्हणून केलेल्या टीकेचा व्हिडिओ शेअर केला आहे.
अजित पवारांनी शिंदेंवर केलेल्या टीकेच्या व्हिडिओ व्हायरल होत असताना खुद्द अजित पवारांनी आपण शिंदेंना गद्दार का म्हटले होते? त्याचे स्पष्टीकरण दिले आहे. अजित पवार म्हणाले, 'मी मागच्या काळात विरोधी पक्षनेता होतो. विरोधी पक्षनेता असता मी जे काही बोललो त्यामध्ये माझी भूमिका त्यावेळेसच्या एकंदरीत परिस्थितीला अनुसरण बोललो.त्या त्या वेळीस ती ती व्यक्ती कुठल्या पक्षात आहे. याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य केली जातात.'
'आम्ही एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेलो. लोकांनी आम्हाला सपोर्ट दिला. आम्हाला मताधिक्य दिलं. आम्ही आज एकत्र आहोत एकत्र काम करतोय. राज्याला पुढे देण्याचा मनापासूनचा प्रयत्न करतोय.', असे देखील अजित पवार म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या व्यंगात्मक कवितेवर कुणाल कामराने माफी मागण्या स्पष्ट नकार दिला आहे. तो म्हणाला मी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माफी मागणार नाही. मी कोणालाही घाबरत नाही. मी काही लपून बसलेलो नाही.
कुणाल कामरा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला. दरेकर म्हणाले, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अवमान हा सभागृहात प्रत्येकाचा अवमान आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.