

महायुतीच्या दुसऱ्या टर्ममध्ये भाजप आणि शिंदे गटातील मतभेदांची चर्चा सुरू आहे.
एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली व गावी जाण्याबाबत नाराजीच्या चर्चा रंगल्या होत्या.
या सर्व चर्चांवर शिंदेंनी सडेतोड स्पष्टीकरण देत कारण स्पष्ट केले आहे.
Mumbai News : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असून पहिल्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे दुसऱ्या महायुतीच्या टर्ममध्ये उपमुख्यमंत्री आहेत. पण यावेळी दुसऱ्या टर्ममध्ये आधी लोकसभा त्यानंतर विधानसभा, मंत्रीपदांचे वाटपासह नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या जागावाटपावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील मतभेद समोर आले होते. तर या ना त्या कारणाने अनेकदा एकनाथ शिंदे नाराज होऊन कधी त्यांच्या गावी तर कधी दिल्ली गेल्याचे पाहायला मिळाले आहे. यावरून जोरदार चर्चाही झाल्या असून त्यांनी साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट कार्यक्रमात सडेतोड उत्तर दिले आहे. तर आपण का नेमकं गावी आणि दिल्ली जातो यावर स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. सध्या या स्पष्टीकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये कुरघोडीचं राजकारण रंगल्याचे दिसून आले आहे. राज्यभर भाजपने विविध निवडणुकांसह मंत्रिमंडळातील जागा वाटपात कुरघोडी केल्याची चर्चा झाली होती. त्यावेळी अस्वस्थ झालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तडकाफडकी आपल्या सातारा जिल्ह्यातील दरे गाव गाठले आहे. त्याच्याही मोठ्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.
तर अनेक कारणांसह मध्यतंरी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लावलेल्या पक्ष प्रवेशांमुळे त्यांच्यासह शिवसेनेची अस्वस्थता वाढवली होती. भाजपने त्यांच्या पक्षाच्या माजी नगरसेवकांसह नगराध्यक्षांना आपल्या गळाला लावले होते. यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला होता. तर एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीची आजही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
या नाराजी नाट्यासह सतत दरे गावी आणि दिल्ली दौऱ्यावर आज त्यांनी मौन सोडले आहे. यावेळी त्यांनी, आपल्या विरोधकांनाही खडेबोल सुनावले आहे. शिंदे यांना, तुमच्या बाबत सध्या राज्यात असे चित्र तयार झाले की, एखादी गोष्ट आपल्या मना सारखी झाली नाही ते गावी निघून जातात, दिल्ली गाठतात, मंत्रिमंडळाच्या बैठकीलाच येत नाहीत? असं चित्र नेमकं काय तयार होत आहे.
या प्रश्नावर त्यांनी, हे चित्र आम्ही कुठं तयार करतो. तुम्हीच ते तयार करता असे माध्यमांना म्हटलं आहे. तर मला जेव्हा गावी जायचं असतं तेव्हा मी गावी जातो. परवाच मी गावी जावून आलो. तेथेच होते. तेव्हा काय नाराजी होती का? तिकीट वाटप बाकी होतं का? गेलो मी गावी.
मी गावी गेलो की बातमी होते, दिल्लीला गेलो की बातमी होते. मात्र मी एनडीएचा भाग आहे. त्यामुळे मला दिल्लीला जावं लागतं. एनडीएचा भाग असल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा बैठक बोलावतात तेव्हा जावं लागतं. तर मोदी यांचाही एनडीएला मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे दिल्लीला गेलो की मोदींना भेटतो, अमितभाईंना भेटतो, संबंधीतांनाही भेटतो.
तसेच फक्त त्यांचा घटक पक्ष आहे म्हणून नाही तर त्यांनी आम्हाला पक्ष शिवसेना म्हणून मान सन्मान दिला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर तर खासदार श्रीकांत शिंदे यांना मोदींनी व्यासपीठ मिळवून दिलं. जे जगभर डिलेगेट्स गेले त्यातील एका गटाचे नेतृत्व श्रीकांत शिंदे यांनी केलं होतं.
त्यामुळे इथर पक्षांप्रमाणे आमची भाजपसोबत युती नाही किंवा समझोता वगैरे नाही. आमची विचार धारेवर झालेली युती आहे. आमची स्वार्थासाठी झालेली युती नाही. मला काय मिळेल मला काय मिळेल असे पाहणारे अनेक नेते आहेत, पण मी तसा नाही, असे म्हणत स्पष्टीकरण देताना नाराजी नाट्यावरून चर्चा करत टीका करणार्यांना टोला लगावला आहे.
Q1. एकनाथ शिंदे दिल्ली आणि गावी का जात असल्याची चर्चा होती?
➡️ महायुतीतील मतभेद आणि नाराजीमुळे ते बाहेर पडत असल्याच्या चर्चा होत्या.
Q2. एकनाथ शिंदेंनी या चर्चांवर काय उत्तर दिलं?
➡️ त्यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडत नाराजी नसल्याचे सांगितले.
Q3. महायुतीमध्ये मतभेद नेमके कशावरून आहेत?
➡️ निवडणुकीतील जागावाटप, मंत्रिपदांचे वाटप आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवरून.
Q4. शिंदे गट आणि भाजपमधील संबंध तणावपूर्ण आहेत का?
➡️ मतभेद असले तरी सरकार स्थिर असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Q5. शिंदेंच्या स्पष्टीकरणावर राजकीय प्रतिक्रिया काय आहेत?
➡️ त्यांच्या स्पष्टीकरणाची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.