

Maharashtra drought news: सरकारकडून राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या तीन पथकांनी राज्यातील विविध जिल्ह्यात जावून दुष्काळाची पाहणी केली.याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली.यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, दुष्काळी परिस्थिती आणि त्याचा शेतीवर होणारा परिणाम लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपले गोधन विकू नये. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन दिले.
रविवारी (ता. 11) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांनी गोधन विकू नये,दुष्काळाच्या काळात पशुधन जगवण्यासाठी सरकार आवश्यक त्या उपाययोजना करेल. गरज पडल्यास मोठ्या प्रमाणावर चारा डेपो सुरू केले जातील, तसेच जनावरांसाठी पाण्याचीही व्यवस्था केली जाईल,असे आश्वासन दिले.
एल निनोमुळे राज्यात यावर्षी पाऊस कमी झाला. अनेक भागांत शेती आणि पशुपालनाबाबत आव्हाने निर्माण झाली आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी केवळ पिकांचाच नव्हे, तर पशुधनाचाही विचार करावा, दुष्काळामुळे जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे परिस्थितीनुसार चारा डेपो उभारणे आणि चाऱ्याचे योग्य नियोजन करणे यावर सरकार भर देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांना दिलासा देण्यासाठी सरकार विविध उपाययोजना राबवत आहे. शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा उपलब्ध करून देण्याबरोबरच पीककर्जमाफीची योजनाही सुरू ठेवण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले.
गावपातळीवर पाणी व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला चालना देण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गावांमधील तलावांतील गाळ काढणे, जलसाठ्याची क्षमता वाढवणे आणि दुष्काळाचा प्रभाव कमी करण्यासाठी स्थानिक पातळीवर उपाययोजना करणे यावर भर दिला जाणार आहे.
अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. त्यामुळे सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. योजनांची अंमलबजावणी,पूर्तता आणि प्रत्यक्ष कामातील परिणाम यानुसार गुणांकन पद्धती ठरविण्यात येणार आहे.अपेक्षित कामगिरी न करणाऱ्या अधिकाऱ्यांना यासाठी जबाबदार धरले जाईल,असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.