Mumbai News : राज्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापसाच्या पॅटर्नमधून बाहेर पडावे, असे आवाहन करतानाच राज्यातील महायुती सरकारने निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता कर्जमाफी केली आहे. राज्यातील 40 लाख शेतकऱ्यांना काही न करता कर्जमाफी दिली असल्याचे सीएम देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यासोबतच यावेळी सीएम फडणवीसांचे अर्थ खात्याबाबत मोठे विधान केले आहे.
केंद्रातील मोदी सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमाशी संवाद साधला. यावेळी पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नाला उत्तरे दिली. यावेळी पत्रकारांनी येत्या काळात अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याबाबत काही संकेत आहेत का? अशी विचारणा पत्रकार परिषदेत केली होती. त्यावेळी आज तरी अर्थखाते आपल्याकडेच असल्याचे सीएम फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सीएम फडणवीस यांनी मोदी सरकारच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. मोदी सरकारला 12 वर्षे पूर्ण झाली. या बारा वर्षात केंद्र सरकारने 360 डिग्रीचा बदल घडवला असे कौतुक करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास कामांची जंत्रीच वाचली. देशात 3 कोटी महिला लखपती दीदी झाल्या आहेत. आता 6 कोटी महिला लखपती होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
केंद्रातील मोदी (Narendra Modi ) सरकारची आतापर्यंतची कारकीर्द उल्लेखनीय राहिली आहे. या काळात सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही. गेल्या 12 वर्षांत मोदी सरकार हे बेदाग आहे असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांनी 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. त्यांना आता चांगलं आयुष्य जगता येत आहे. त्यांना किमान दोन वेळेच्या जेवणाची चिंता नसावी यासाठी अन्नधान्य योजना चालू ठेवल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
कर्जमाफीसाठी सरकारकडून उपसमितीची स्थापना
कर्जमाफी संदर्भात एक उपसमिती तयार केलेली आहे. मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर काही मंत्र्यांचा त्यात समावेश असेल. ही कर्जमाफी जशी पुढं जाईल त्यातील अडचणी समोर येतील, त्या अडचणी सोडवण्याची जबाबदारी या उपसमितीची असेल. कुठल्याही निवडणुका समोर नसताना ही कर्जमाफी केलेली आहे. विरोधी पक्षांनी कोणतीही ठोस मागणी न करता केलेली कर्जमाफी असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारच्या सूचनेनुसारच शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. जनावरांसाठी सरकार वैरण उपलब्ध करून देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.