Cabinet Decisions : फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक: 6 मोठ्या निर्णयांचा 'या' जिल्ह्यांना होणार बंपर फायदा?

6 major cabinet decisions Maharashtra : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र मंत्रिमंडळाने 6 महत्त्वाचे निर्णय मंजूर केले आहेत. या निर्णयांचा कोणत्या जिल्ह्यांवर परिणाम होणार आणि विकासाला कसा वेग मिळणार, जाणून घ्या.
devendra fadnavis
devendra fadnavis sarkarnama
Published on
Updated on

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत विविध क्षेत्रांशी संबंधित 6 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आरोग्य, पाणीपुरवठा, तंत्रज्ञान, रोजगार आणि नगरविकास या क्षेत्रांमध्ये राज्याच्या विकासाला चालना देणारे निर्णय मंजूर करण्यात आले असून त्याचा फायदा लाखो नागरिकांना होणार आहे.

वैद्यकीय उपचारांमध्ये अचूकता यावी यासाठी निदान प्रणालीतील महत्वाचा असा प्रकल्प नागपूर येथे राबविण्यात येणार आहे. त्यासाठी हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्प (High Energy Medical Cyclotron Project- NHECP) उभारणीस मान्यता. मध्य भारतातील एकमेव महत्वाकांक्षी प्रकल्प असणार आहे. ज्यामुळे गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रणालीमुळे विविध रोगांचे, आजारांचे निदान करण्यासाठी या प्रणालीचा वापर करता येईल. (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)

devendra fadnavis
Farmer ID Registration : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! घरबसल्या स्वतःच बनवा 'फार्मर आयडी'; नाहीतर अडकणार पीएम किसानचा 23वा हप्ता

महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण २०२६ जाहीर. राज्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजनांवर भर. ग्रामीण पेयजल योजनांचा शाश्वत विकास होणार. विविध योजनांचे एकत्रिकरण करून धोरण राबविण्यात येणार. स्वच्छ, निर्जंतुक व दर्जेदार पाणी पुरवठा व्हावा यासाठीचे नियोजन. योजना चांगल्या रितीने राबविण्यासाठी दीर्घकालीन नियोजन होणार. (पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग)

महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली (Maharashtra Unmanned Systems Policy) धोरण-२०२६ जाहीर. हवाई, सागरी तसेच जमिनीवरील कृषि व अन्य ठिकाणच्या विविध कामांसाठी या स्वयंचलित प्रणालीतील उपकरणांची निर्मिती करण्यासाठीचे धोरण. जोखमीच्या आणि अवघड परिस्थितीतील कामांसाठी वापरता येणाऱ्या ड्रोनसह, विविध रोबोटसची निर्मिती या क्षेत्रातील संशोधन व विकास, मनुष्यबळ प्रशिक्षण आदी उपक्रमांना प्रोत्साहन मिळणार. (इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमत्ता विभाग)

राज्यात भारत नेट कार्यक्रम राबविण्यासाठी सुधारित पद्धतीस मंजुरी. हा (Amended Bharat Net Program) कार्यक्रम राबविण्यासाठी "महानेट डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MDIL)" या नावाने विशेष हेतू वहन यंत्रणा (State-led Special Purpose Vehicle - SPV) स्थापन करणार.

(इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमत्ता विभाग)

devendra fadnavis
CJP Movement Controversy : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर सोशल मीडियावर काय होतीय टीका

विकसित भारत - जी राम जी (व्ही बी जी राम जी) योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी विकसित भारत - जी राम जी कायदा, २०२५ या कायद्याशी सुसंगत अशा तरतुदी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७ मध्ये करण्यात येणार. या तरतुदी तसेच अध्यादेश निर्गमित करण्यास मान्यता.

(नियोजन विभाग)

स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची अंतिम मुदतवाढ. त्यासाठी मुंबई महापालिका अधिनियम, महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. (नगर विकास विभाग)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com