

Pune News : पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात एका कॅम्पसचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. पुण्यात विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीचा कालच निषेध केला आहे. बापटांची मराठी शुद्धतेचा नमुना आहे. त्यांची मराठी सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. त्यामुळे मराठीप्रमाणेच त्यांचे विचार देखील सर्वसमावेशक व्हावेत, असा मिश्किल टोला फडणवीस यांनी लगावला.
पुण्यातील कोरेगाव पार्क येथे बजाज फिनसर्वच्या आर्थिक सेवा व्यवसायांसाठी उभारण्यात येणाऱ्या कॅम्पसचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बजाज फिनसर्वचे अध्यक्ष संजीव बजाज, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी सीएम देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
सण, उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे केले पाहिजे. या उत्सवात लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येत्या काळात लोकसहभागानेच डीजेचे स्वरूप कमी होत जाईल, त्यासोबतच येत्या काळात कायद्यापेक्षाही लोकांना सोबत घेऊन काही गोष्ट बंद कराव्या लागतील, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सीएम फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र हे देशाची फिनटेक कॅपिटल झाले आहे. सर्वात मोठ्या फिनटेक कंपनीचे उदघाटन झाले आहे. यामाध्यमातून 40 हजार जणांना रोजगार मिळाला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.