Devendra Fadnavis : 'स्वतःचे आमदार सांभाळले नाहीत…'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis reaction News : नागपूर पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारानिमित्ताने सीएम देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
Uddhav Thackeray | Devendra Fadnavis
Uddhav Thackeray | Devendra Fadnavis Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानासाठी शेवटचे पाच दिवस उरले आहेत. त्यामुळे प्रचाराच्या निमित्ताने सत्ताधारी व विरोधक यांच्यात कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनात रेजीम चेंजबद्दल अभिजित दिपके, प्रशांत भूषण यांनी वक्तव्य करीत चर्चेला तोंड फोडले असतानाच आता त्यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान रेजीम चेंजबद्दल बोलले आहेत. त्यावरून नागपूर येथे बोलताना सीएम देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. त्यांचे आमदार पक्ष सोडून जात असताना, ते त्यांना थांबवू शकले नाहीत. त्यांनी आपले आमदार सांभाळले नाहीत, अशा शब्दांत फडणवीस यांनी टीका केली.

नागपूर पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारानिमित्ताने सीएम देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली. 2019 मधील राजकीय घडामोडींनंतर राज्यात सत्तापरिवर्तन झाले, ज्याबद्दल अनेकदा विविध चर्चा केल्या जातात. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी मोठे विधान केले आहे.

यावेळी फडणवीस म्हणाले, 'त्यांचे आमदार पक्ष सोडून जात असताना, ते त्यांना थांबवू शकले नाहीत. या सत्तांतरामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची होती. त्यांनी आपले आमदार सांभाळले नाहीत आणि आपल्या लोकांचा विश्वासही संपादन करू शकले नाहीत, ज्यामुळे ते बाहेर पडले. त्यामुळे हे सत्तापरिवर्तन कोणीही रोखू शकले नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Uddhav Thackeray | Devendra Fadnavis
Amravati Teachers Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांत जुंपली; समन्वय बैठकीत चालले असमन्वयाचे बाण

पहिली गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे स्वत: शिवसेनेत रेजीम चेंज रोखू शकले नाहीत. ते दुसऱ्या कुठल्या रेजीम चेंजबद्दल बोलतयात मला माहित नाही. जेव्हा त्यांच्या पक्षाने हिंदुत्व सोडले, हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले तेव्हा अशी परिस्थिती आली की, ज्यांना बाळासाहेबांच्या विचारांवर चालायचे होते, त्यांनी खरी शिवसेना बनवली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Uddhav Thackeray | Devendra Fadnavis
Congress vs Uddhav Thackeray : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा उद्धव ठाकरेंना धोका, 'मविआ'त फूट? अमरावतीने समीकरण बदलले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com