

Amravati News : अमरावतीत शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 23 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. यासाठी जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. निवडणुकीसाठी प्रचार सुरु असतानाच महायुतीच्या समन्वय बैठक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडली. या महायुतीच्या समन्वय बैठकीत नेत्यांमध्येच असमन्वयाचे बाण चालल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे बैठकीवेळीच वातावरण चांगलेच तापले होते.
या बैठकीत सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार संजय खोडके यांनी विद्यमान आमदार किरण सरनाईक यांच्यावर प्रचारादरम्यान संवादाचा अभाव असल्याचा आरोप केला. यावर प्रत्युत्तर देताना सरनाईक यांनी, अर्ज भरण्याच्या दिवशीच फोन केला, प्रत्येकाशी संपर्क करणे शक्य नाही, या शब्दात खोडकेना सुनावले.
एकीकडे महायुतीमधील हा अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असताना, शिंदेंचे मंत्री उदय सामंत यांनी दिलगिरी व्यक्त केली; मात्र दिलगिरी म्हणजे सरेंडर होणे नाही, असा इशाराही त्यांनी दिला. या संपूर्ण वादावर भाजप (BJP) खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी मार्मिक प्रतिक्रिया देत, "कोणाचीही नार्कोटेस्ट करू नका, ही नेत्यांच्या नार्कोटेस्टची वेळ नाही, तर तिकडे शिक्षकच उमेदवाराची नार्कोटेस्ट करायला बसले आहेत, अशी प्रतिक्रिया दिली.
अमरावतीत शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महायुतीमधील समन्वयाबाबत नेत्यांमध्येच असमन्वयाचे बाण चालल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे बैठकीवेळीच या नेतेमंडळींने केलेल्या या वक्तव्याने वातावरण चांगलेच तापले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.