Women reservation : महिला आरक्षणावरून CM फडणवीसांची मोठी घोषणा; महाराष्ट्रातील 1 कोटी महिलांपर्यंत पोहोचणार

CM Devendra Fadnavis : मी विरोधी पक्षातील नेत्यांना ओपन चॅलेंज देतो. माझ्या बरोबरीच्या त्यांच्या कोणत्याही नेत्याने माझ्याशी खुलेपणाने महिला आरक्षणावर चर्चा करावी, असे आव्हानही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
CM Devendra Fadnavis
CM Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra women campaign : लोकसभेमध्ये महिला आऱक्षणाशी संबंधित विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजपने विरोधी पक्षांविरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. सर्व भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत विरोधकांचा खरपूस समाचार घेत आहेत. सोमवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषदेत विरोधकांवर जोरदार प्रहार केला. तसेच विरोधी नेत्यांना आव्हानही दिले.

विरोधकांनी महिला आरक्षणाची भ्रूणहत्या केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री फडणवीसांनी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांवर टीका केली. फडणवीस म्हणाले, ज्या विरोधी पक्षांनी २०२३ मध्ये महिला आरक्षणाला पाठिंबा दिला, आता त्यांनी ठरवून विरोध केला. त्यांना महिला आरक्षण येऊच द्यायचे नव्हते.

मी विरोधी पक्षातील नेत्यांना ओपन चॅलेंज देतो. माझ्या बरोबरीच्या त्यांच्या कोणत्याही नेत्याने माझ्याशी खुलेपणाने महिला आरक्षणावर चर्चा करावी. पण ते करणार नाहीत, असेही फडणवीस म्हणाले आहे. आता महिला आऱक्षणाबाबत महिलांना एकत्रित करून विरोधी पक्षांविरोधात एकजुट करण्यासाठी एक कोटी महिलांच्या सह्या घेणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

CM Devendra Fadnavis
Modi Government news : PM मोदींचा मास्टरस्ट्रोक; केंद्रीय मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा द्यावा लागलेल्या नेत्यावर देशाची मोठी जबाबदारी

देशात २०२९ मध्ये महिला आरक्षण लागू होईल. त्यासाठी महिलाच विरोधी पक्षांना वठणीवर आणतील, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला. लोकसभा आणि विधानसभेत महिलांचा सहभाग वाढवा, यासाठी हे विधेयक आणण्यात आले होते. ते लागू करण्यासाठी जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचना आवश्यक आहे. २०२३ च्या घटनादुरूस्तीनुसारच हे विधेयक आणण्यात आले होते. पण विरोधकांनी आता त्याला विरोध केला, असे फडणवीस म्हणाले.

CM Devendra Fadnavis
IAS viral video : 'म्हाडा'च्या IAS उपाध्यक्षांची थेट तरूणाला 'उचलून' नेण्याची भाषा; शेकडो लोकांसमोरच घडला प्रकार...

महिलांना आरक्षण मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. महिलांना आम्ही संघटित करू. काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी, राहुल गांधी यांनी देशाची माफी मागायला हवी, असे फडणवीस म्हणाले. ते महिला विरोधी आहेत. एनडीएजवळ दोन तृतियांश बहुमत असते तर या विधेयकाला विरोधकांना समर्थन दिले असते. पण त्यांचा चेहरा आता उघडा पडला आहे, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com