Dhananjay Munde in Action : बॅकफूटला गेलेले धनंजय मुंडे पुन्हा अ‍ॅक्टिव्ह,अजितदादांसोबत दिसले, शिवराजला भेटले!

NCP Dhananjay Munde Ajit Pawar : अजित पवार यांच्या दौऱ्याच्या आधी धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात सध्या सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाच्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Dhananjay Munde Politics: संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर विरोधकांच्या निशाण्यावर धनंजय मुंडे होते. त्यांच्या मंत्रि‍पदाच्या राजीनाम्याची मागणी देखील होत होती. अखेर प्रकृतीच्या कारणास्तव राजीनाम देत असल्याचे सांगत धनंजय मुंडे मंत्रिमंडळातून बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाल्याने ती काही दिवस आराम करत होते. अजित पवार हे बीडच्या दौऱ्याावर आल्यानंतर त्यांनी प्रकृतीचे कारण देत दौऱ्यात सहभाग घेतला नाही. मात्र, आता बॅकफूटवर गेलेले धनंजय मुंडे पुन्हा अ‍ॅक्टिव्ह झाल्याचे चित्र आहे.

उपमुख्यमंत्री झाल्यापासून तसेच बीडचे पालकमंत्रिपद स्वीकारल्यापासून अजित पवार हे आज (सोमवारी) पहिल्यांदाच परळीच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात धनंजय मुंडे हे अजित पवारांच्यासोबत दिसले. तसेच वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास कामांचा आढावा अजित पवारांनी घेतला तेव्हा मुंडे त्यांच्यासोबत होते.

Dhananjay Munde
Shivsena Politics : एकनाथ शिंदेंच्या विश्वासू नेत्याकडून मिलिंद नार्वेकरांना शुभेच्छा, काही तरी शिजतंय?

अजित पवार यांच्या दौऱ्याच्या आधी धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात सध्या सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, विविध आघाडी व फ्रंटल सेलचे सहकाऱ्यांची चर्चा केली. तसेच पक्ष संघटना अजून मजबूत करण्यासाठी सूचना केल्या.

शिवराजची घेतली भेट

परळी तालुक्यातील लिंबोटी गावातील शिवराज दिवटे या तरुणाला 20 जणांनी मिळून बेदम मारहण केली होती. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या मारहाणीला जातीयरंग देण्याचे प्रयत्न होत असल्याचे आरोप करण्यात येत आहे.

त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी शिवराज दिवटे याची रविवारी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई येथे भेट घेऊन त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. मारहाण केलेल्या सर्व आरोपींवर कसलीही गय न करता कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

Dhananjay Munde
Maharashtra Politics: दक्षिण महाराष्ट्रात महायुतीचे पारडे जड, मविआसमोर आव्हाने

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.