

Dharashiv : दहा महिन्यानंतर सततच्या पावसाची नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे. (Kailas Patil News) निकषाच्या बाहेर जाऊन १३ हजार ६०० रुपयाने मदत देण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने पुन्हा साडेआठ हजार रुपयाचा शब्द दिला. तर प्रत्यक्षात देताना मात्र फक्त चार ते पाच हजार रुपयावरच बोळवण केली जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
शेतकऱ्यांसोबत अशी लबाडी करणाऱ्या सरकारचे तुणतुणे सत्ताधारी कितीकाळ वाजवणार, असा संताप ठाकरे गटाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी व्यक्त केला. (Kailas Ghadge Patil) गतीमान व वेगवान अशा कोट्यावधी रुपयाच्या जाहिराती करणाऱ्या (Osmanabad) सरकारने शेतकऱ्यांना मदत देताना मात्र ही गतीमानता, प्रामाणिकपणा दाखवली नाही.
विम्याबाबत कंपनीधार्जिणे धोरण घ्यायचे, सततच्या पावसाच्या अनुदानाला दहा महिने विलंब करायचा, कांदा अनुदानात जाचक अटी लावुन शेतकरी (Affected Farmers) पात्र होणार नाही याची काळजी घ्यायची, खरेदी केंद्र वेळेवर सूरु न करता शेतकऱ्यांचे नुकसान करायचे व व्यापार्यासाठी पुरक वागायचे अशा कितीतरी गोष्टी सरकारने केल्या. सततच्या पावसाचे अनुदान देण्यासाठी राज्य सरकारला दहा महिन्याचा वेळ का लागला ?
सूरुवातीला सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १३ हजार ६०० रुपयाने अनुदान दिले होते. मग नंतरच्या काळात सरकारला या विषयावर एक तज्ञ समिती नेमण्याची आवश्यकता वाटली. त्यातुनही मदत देण्याचा आव सरकारने आणला, पण शासन निर्णयामध्ये त्यांचा खोटारडेपणा उघड झाला. त्या आदेशामध्ये त्यानी साडेआठ हजार रुपयानुसार मदत देण्याबाबत सांगितले. शेतकऱ्यांना मदत देतानाच सरकार एवढा का विचार करत आहे? असा सवाल पाटील यांनी केला आहे.
विरोधी पक्षाकडुन वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही हा शासन आदेश काढला. त्यानंतरही मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिक्षाच करावी लागल्याचे चित्र आहे. आता काही दिवसापासुन ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सूरुवात झाल्याचे दिसु लागले. मात्र मदतीची रक्कम साडेआठ हजार रुपये सुध्दा नसल्याचे समोर आहे आहे. ही रक्कम चार ते पाच हजार रुपयेच मिळत आहे. शेतकऱ्यांचे सरकार असे म्हणुन कोट्यावधीच्या जाहिराती करणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांची फसवणुक करताना काहीच वाटले नाही का? असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.