Dilip Walse Patil News : ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्याकडे राज्याचे अर्थमंत्री पद सोपवले जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. या सर्व चर्चांवर आता स्वतः वळसे पाटील यांनी मौन सोडले असून, अत्यंत सूचक आणि महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना नवीन धुमारे फुटले आहेत.
'एबीपी माझा'ने दिलेल्या वृत्तानुसार, पंढरपूरच्या दौऱ्यावर असलेल्या वळसे पाटील यांना पत्रकारांनी अर्थमंत्रीबाबत होणाऱ्या चर्चांवर विचारले असता ते म्हणाले, "मी अर्थमंत्री होणार, ही चर्चा फक्त आणि फक्त माध्यमांमध्ये सुरू आहे. याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. या संदर्भातील अंतिम निर्णय आमचे पक्षश्रेष्ठी योग्य वेळी घेतील."
"अर्थमंत्री पदाबाबत पक्षश्रेष्ठी संबंधितांशी किंवा अंतर्गत पातळीवर काही बोलत असतील, तर मला त्याविषयी कोणतीही माहिती नाही. मात्र, ज्यावेळी त्याचा अंतिम निर्णय होईल, तेव्हा तो लपून राहणार नाही आणि तो सर्वांनाच कळेल.", असे देखील ते म्हणाले
"राजकारणात उद्या नेमके काय घडेल हे कधीच आधी सांगता येत नसते," असे म्हणत त्यांनी राजकारणातील अनपेक्षित घडामोडींवर बोट ठेवले. पुढे बोलताना ते म्हणाले, "त्यामुळे थोडी वाट पाहू आणि चांगलेच ऐकायला मिळेल," असे सूचक विधान केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेले अर्थमंत्रिपद पुन्हा राष्ट्रवादीला मिळावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. जय पवार यांनी एका कार्यक्रमात जाहीरपणे सांगितले होते की, सुनेत्रावहिनी, पार्थदादा यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली असून राष्ट्रवादीला अर्थमंत्रीपद लवकरच मिळेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.