Nashik Ring Road : CM फडणवीसांच्या भेटीसाठी निघालेल्या शेतकऱ्यांना मंत्री उदय सामंतांनी लावला ब्रेक, आश्वासनानंतर आंदोलक फिरले माघारी

Uday Samant Intervenes in Nashik Ring Road Farmers' Protest : वर्षा बंगल्यावर सीएम देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवलं. त्यानंतरही सीएम यांच्या भेटीसाठी ठाम राहिलेल्या शेतकऱ्यांची मंत्री उदय सामंत यांनी भेट घेतली.
Uday Samant Intervenes in Nashik Ring Road Farmers' Protest
Uday Samant Intervenes in Nashik Ring Road Farmers' ProtestSarkarnama
Published on
Updated on

Nashik Ring Road Farmers Protest : नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित असेल्या रिंगरोड प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. भूसंपादनामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी योग्य मोबदला आणि जुन्या अलाइनमेंट नुसार रिंगरोड व्हावा, अशी मागणी केली आहे.

या मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईकडे निघालेल्या शेतकऱ्यांना नाशिक पोलिसांनी अडवून ताब्यात घेत पोलीस मुख्यालयात थांबवले होते. दिवसभर शेतकऱ्यांना तिथेच बसवून ठेवण्यात आलं. शेतकऱ्यांनी तेथेच रात्रभर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्याशिवाय पोलिस स्थानकातून घरी परतणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. मात्र, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शेतकऱ्यांची समजूत घालत व आश्वासन देत त्यांना थांबवलं.

दरम्यान, नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या शेतकऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांना त्रास देऊन शासनाला कुठलाच प्रकल्प करायचा नाही असे सामंत म्हणाले. आपण सुरुवातीला सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची पहिली भेट घेऊ, त्यांच्याकडे पहिली बैठक करु त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे जाऊ असं सामंतांनी शेतकऱ्यांना सांगितलं. पुढील आठवड्यात ही बैठक होणार असून सामंत यांनी या बैठकीची जबाबदारी घेतली.

Uday Samant Intervenes in Nashik Ring Road Farmers' Protest
Nashik Ring Road : CM फडणवीसांच्या भेटीसाठी मुंबईकडे निघालेल्या शेकडो शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?

पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून जमिनींना योग्य मोबदला देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन सामंत यांनी दिले. त्यानंतर रिंग रोड बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शेतकरी माघारी फिरले.

फोनवर शिवेंद्रराजेंशी संवाद

मंत्री उदय सामंत यांनी शेतकऱ्यांसमोर फोनवरून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी चर्चा केली. यावेळी सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मंत्री भोसले यांनी दिले. जोपर्यंत बैठक व निर्णय होत नाही तोपर्यंत कोणतीही कार्यवाही केली जाणार नाही असे त्यांनी शेतकऱ्यांना अस्वस्थ केलं.

Uday Samant Intervenes in Nashik Ring Road Farmers' Protest
Nashik Ring Road : कुंभमेळा रिंगरोड भूसंपादनाला वेग, जिल्हाधिकाऱ्यांचा मास्टरप्लॅन ; 25 टक्के अतिरिक्त मोबदला अन् Joint Account'चा पर्याय

काल हे सर्व रिंगरोड बाधित शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईकडे निघाले असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यापूर्वी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आणि आमरण उपोषणही केले आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भूसंपादन वेगाने होत असले, तरी शेतकरी भूमीहिन होण्याच्या भीतीने अलाइनमेंट बदलण्याची व योग्य मोबदल्याची मागणी करत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी देखील शेतकऱ्यांना मध्यम मार्ग काढून न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com