Disha Salian : ‘आदित्य ठाकरे अन् इतर दिशाच्या घरात...? नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करा'; सालियान यांच्या वकिलाचा आरोप

Disha Salian Case News : दिशा सालियान मृत्यू प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात भूकंप आला असून आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी दिशाचे वडिल सतीश सालियान यांनी मुंबई हाय कोर्टात याचिका केली आहे.
Disha Salian And Aaditya Thackeray
Disha Salian And Aaditya Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : दिशा सालियान मृत्यू प्रकरणात पाच वर्षानंतर आता नवा ट्विस्ट आला असून तिचे वडिल सतीश सालियान यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सालियान यांनी न्यायालयात याचिका दाखल करत, दिशाचा सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. तर या प्रकणार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल कराला अशी मागणी केली आहे. यानंतर आता सालियान यांचे वकील निलेश ओझा यांनी आपल्याकडील पुराव्यांच्या आधारावर आदित्य ठाकरे अन् इतर दिशाच्या घरात दोन तास होते, असा दावा केला आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पाच वर्षांनी हे प्रकरण का समोर आणलं जात आहे? आत्ताच का प्रकरण उचलून धरलं जात आहे? या प्रकरणी आधी का दिशाच्या कुटुंबियांनी आवाज उठवला नाही? असे प्रश्न आता विचारले जातायत. यावरून ओझा यांनी याच्याआधी अडीच वर्ष महाविकास आघाडीचेच सरकार होतं. यामुळे कुटुंबियांवर दबाव होता. पोलिसही दबाव टाकत होते असा खुलासा केला आहे. पण अडीच वर्षानंतर महायुतीचे सरकार आले आणि याप्रकरणी पुन्हा काम सुरू झाल्याचे म्हटलं आहे.

यावेळी ओझा यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणात खरी माहिती बाहेर आणायची असेल तर आधी आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करा. त्यांची चौकशी करा अशी मागणी केली आहे. तर दिशा सालियानच्या घरी आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि इतर दोन ते तीन तास होते. याचे पूरावे असून त्यांची कस्टडी घेण्यात, यांची लाईव्ह डिटेक्ट, नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट घेण्यात याव्यात, म्हणजे सत्य समोर येईल.

Disha Salian And Aaditya Thackeray
Disha Salian Death case : ठाकरेंच्या बचावासाठी शिंंदेंचा आमदार मैदानात; ‘एकाही नेत्याचा सहभाग आढळला नाही,...तीन वर्षांपासून आमचंच सरकार, मग दबाव कुठे?’

त्यामुळेच आपण न्यायालयात गेलो असून आता सरकारने आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि इतरांविरोधात गँगरेप, मर्डर 376 डी, 302, 120 अशा विविध कलमांखाली गुन्हे दाखल करावेत. आरोपींना मृत्यूदंड होईल, हे सुनिश्चित करावं, असे म्हटलं आहे.

तसेच याच्याआधी सरकार यांचेच असल्याने दबदबा होता. पण आता आरोपींचा दबदबा चालू नये यासाठी निष्पक्ष कारवाई करण्यात यावी. त्यासाठी केस ट्रान्सफर करण्यासह याचिकाकर्ते, वकील, साक्षीदार यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे. तर या प्रकरणात समीर वानखेडे यांच्याकडे महत्त्वाच डेटा असून त्यांनाही पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

पोलिसांनी पिक्चरच्या स्क्रिप्ट प्रमाणे

दरम्यान दिशाचे कुटुंबियांनी आतापर्यंत त्यांच्या मुलीचा बलात्कार झाला? तिच्या हत्या झाली? असा आरोप केला नाही? असा सवाल केला जातोय. असा प्रश्न विचारल्यावर ओझा यांनी, हा प्रश्न फक्त त्यांचे दलालच विचारू शकतात. पण त्यांच्या काळात दुसऱ्यांच्या मुलीवर बलात्कार करायचे, मर्डर करायचे, ज्याने आवाज उचला त्याला मारायचं महिलांना हरामी म्हणायचं घर फोडायची असे नाटक चालत होतीत. याचा त्यांच्यावर दबाव होता. यांच्या सरकारच्या काळात पोलिस घरी जाऊन पिक्चरच्या स्क्रिप्ट प्रमाणे त्यांनी माहिती देऊन कोणाला काही सांगू नका असे म्हणत असत.

Disha Salian And Aaditya Thackeray
Disha Salian Death : पाच वर्षानंतर दोन फोटो समोर! खरंच दिशा 14 व्या मजल्यावरून पडली का?

पण नंतर सरकार बदललं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. यानंतरच या केसला गती मिळाली. आधी 2023 मध्ये जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली. त्यानंतर अकरा डिसेंबर 2023 ला तीन कमिट्यांची घोषणा झाली. यानंतर 12 जानेवारी 2024 ला हा महत्वाचा दिवस ठरला. ज्या दिवशी लेखी तक्रार पुराव्या सहित आरोपीचे नाव लिहून, आदित्य ठाकरे यांच्याविरोधात तक्रार पोलिसांना दिली. त्याच्यावर एसआयटीने आम्हाला तक्रार घेतल्याचे पत्र दिले होते, असेही ओझा यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com