Phaltan Doctor Death : डॉक्टर तरुणीवर अत्याचार करणाऱ्या PSI गोपाळ बदनेचे शेवटचे लोकेशन पंढरपुरात; पोलिसांकडून चौकशी सुरू

PSI Gopal Badne News : भाऊबीजेच्या दिवशी फलटण उपजिल्हा रुग्णालयातील तरुण डॉक्टरने आत्महत्या केली. हातावर सुसाईड नोट लिहून पीएसआय गोपाळ बदने आणि घरमालक प्रशांत बनकर यांना जबाबदार ठरवले आहे.
PSI Gopal Badne
PSI Gopal Badne Sarkarnama
Published on
Updated on
  1. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने भाऊबीजेच्या दिवशी आत्महत्या केली असून, तिने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पीएसआय गोपाळ बदने व घरमालक प्रशांत बनकर यांच्यावर आरोप केले आहेत.

  2. सुसाईड नोटनुसार गोपाळ बदनेने तिच्यावर चार वेळा बलात्कार केल्याचे नमूद केले असून, पोलिसांनी प्रशांत बनकरला अटक केली आहे, तर गोपाळ बदने फरार आहे.

  3. गोपाळ बदनेचे शेवटचे मोबाईल लोकेशन पंढरपुरात आढळल्याने पोलिसांनी पंढरपूर व बीड जिल्ह्यात शोध मोहीम सुरू केली आहे.

Solapur, 25 October : सातारा जिल्ह्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीने ऐन भाऊबीजेच्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. संबंधित डॉक्टरने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली असून त्यात तिने पीएसआय गोपाळ बदने, घरमालक प्रशांत बनकर यांच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी आरोपी प्रशांत बनकर याला अटक करण्यात आली असून पीएसआय गोपळ बदने याचे शेवटचे लोकेशन पंढरपुरात आढळून आले आहे, त्यामुळे पोलिसांची दोन पथके त्याच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. तसेच पंढरपूर पोलिसांनी शुक्रवारी रात्रीपासूनच तपास सुरू केला आहे.

फलटणच्या (Phaltan) उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीने गुरुवारी रात्री एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी संबंधित तरुणीने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहून ठेवली आहे, त्यात गोपाळ बदने, प्रशांत बनकर आणि एका माजी खासदाराचे नाव आहे. गोपाळ बदने याने आपल्यावर चार वेळी बलात्कार केल्याचेही तिने सुसाईड नोटमध्ये म्हटलेले आहे.

या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी प्रशांत बनकर याला अटक करण्यात आली आहे. त्याला कोर्टात उभे करण्यात आले आहे. मात्र, सहायक पोलिस निरीक्षक बदने हा मात्र फरार झाला आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची (Police) पाच पथके तपास करीत आहेत. मात्र, तो अद्याप पोलिसांच्या हाती लागू शकलेला नाही.

फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपी गोपाळ बदने हा पंढरपूरमध्ये लपला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण पीएसआय गोपाळ बदने याचे शेवटचे लोकेशन पंढरपूरमध्ये आढळून आले आहे. तो पंढरपूर असण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी पंढरपुरात तपास सुरू केला आहे.

PSI Gopal Badne
Operation Lotus : राष्ट्रवादी माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाला अजितदादांची हरकत; मानेंना पक्षातूनच विरोध, मुख्यमंत्र्यांचा मंगळवेढा दौरा रद्द झाल्याने पक्षप्रवेश लांबणीवर

आरोपी गोपाळ बदने याचे शेवटचे मोबाईल लोकेशन पंढरपुरात असल्याचे आढळून आले आहे, त्यामुळे पंढरपूर पोलिसांकडून गोपाळ बदनेचा शोध सुरू केला असून शुक्रवारी रात्रीपासूनच पंढरपूरचे पोलिस गोपाळ बदनेच्या शोधात आहेत.

दरम्यान, गोपाळ बदने हा मूळचा बीडचा असून तो बीडमध्ये गेला असण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी बीडमध्ये तपास सुरू केला आहे. मात्र, तो अद्याप पोलिसांच्या हाती लागू शकलेला नाही. याच मुद्यावरून विरोधकांनी गृहखाते आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

PSI Gopal Badne
Satara doctor death case : महिला डाॅक्टर आत्महत्या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांना सहआरोपी करा; पुरावे दाखवत दानवेंची मोठी मागणी

Q1. आत्महत्या करणारी महिला कोणत्या रुग्णालयात कार्यरत होती?
A1. ती सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत होती.

Q2. सुसाईड नोटमध्ये कोणावर आरोप करण्यात आले आहेत?
A2. पीएसआय गोपाळ बदने, घरमालक प्रशांत बनकर आणि एका माजी खासदारावर आरोप आहेत.

Q3. पोलिसांनी कोणाला अटक केली आहे?
A3. संशयित घरमालक प्रशांत बनकरला अटक करण्यात आली आहे.

Q4. फरार आरोपी गोपाळ बदनेचा शोध कुठे सुरू आहे?
A4. त्याचा शोध पंढरपूर आणि बीड जिल्ह्यात पोलिसांच्या पथकांकडून सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com