Saurabh Borse Suspended : रुग्ण महिलेच्या विनयभंगप्रकरणी डॉ.सौरभ बोरसे निलंबित, 'ते' कांड ही उघड; महापालिका आयुक्तांकडून गंभीर दखल

Sexual Harassment Police : महिलेचा विनयभंग केल्यानंतर सौरभ बोरसेवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, महापालिकेकडून त्याच्यावर कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे नगरसेविका कविता पाटील यांनी पालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती.
Woman Assault Case dr Saurabh Borse Suspended
Woman Assault Case dr Saurabh Borse Suspended sarkarnama
Published on: 
Updated on: 

Navi Mumbai News : तुर्भेतील नवी मुंबई महापालिकेच्या श्रीरामतनु रुग्णालयातील एका 42 वर्षीय महिलेचा विनंयभंग डॉ.सौरभ बोरसे याने केला होता. या प्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आयुक्त सौरभ राव यांनी बोरसे यांना सोमवारी (ता. २३) सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

डॉ. सौरभ बोरसे याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊन आठवडा उलटला तरी कोणतीही प्रशासकीय कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण होते.

या घटनेनंतर रुग्णालयात उपचारासाठी जाण्यास महिला वर्गात भीती निर्माण झाली होती. अनेक महिलांनी ही भीती लोकप्रतिनिधींकडे बोलून दाखवली होती. याची दखल घेत बोरसेवर तत्काळ निलंबनाच्या कारवाईची मागणी नगरसेविका कविता पाटील यांनी आयुक्तांकडे केली होती.

'ते' कांड उघड

बोरसे याच्या निलंबन आदेशात मोठी माहिती समोर आली असताना त्यांचे आणखी एक कांड समोर आले आहे. डॉ. बोरसे नेरूळ येथील रुग्णालयात कार्यरत असताना त्यांच्याविरुद्ध पालिका पदव्युत्तर पदवी विज्ञान शिक्षण संस्थेच्या विशाखा समितीकडे महिलांच्या लैंगिक छळाची तक्रार प्राप्त झाली होती. यामध्ये ते दोषी आढळले होते.

Woman Assault Case dr Saurabh Borse Suspended
NCP Politics : यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी सुनेत्रा पवार अन् सुप्रिया सुळे एकत्र; राजकीय चर्चांना उधाण

आयुक्तांकडून कडक ताशेरे

डॉ. बोरसे यांच्या गैरवर्तनामुळे महापालिकेची प्रतिमा मलीन झाली असून जनमानसात नवी मुंबई पालिका कर्मचाऱ्यांवरील विश्वासार्हता कमी झाली आहे. अशा घटनांमुळे कर्मचाऱ्यांविरुद्ध जनप्रक्षोभ वाढत आहे. त्यांच्याकडून विनयभंगाच्या घटना वारंवार घडत असून वर्तनात कोणतीही सुधारणा होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ निलंबित करण्यात येत असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी आदेशात स्पष्ट केले करत बोरसेंवर कडक ताशेरे ओढले आहेत.

Woman Assault Case dr Saurabh Borse Suspended
Navi Mumbai News: स्कॉलरशिप हवी तर घरपट्टी-पाणीपट्टीची पावती द्या! महापालिकेच्या नव्या अटींमुळे विद्यार्थ्यांची कोंडी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.