Supriya Sule : सुप्रिया सुळेंच्या मागणीमुळे लाडक्या बहि‍णींना आतापासूनच 2100 रुपये मिळणार, नेमकं काय म्हणाल्या?

Supriya Sule On Ladki Bahin Yojana : "लाडकी बहीण योजना आम्ही सुरुच ठेवणार आहोत. तसंच 2100 रुपयेही आम्ही देणार आहोत. आता अर्थसंकल्पात आम्ही त्याचा विचार आम्ही करु," असं फडणवीस यांनी सांगितलं. त्यांच्या याच वक्तव्याचा आधार घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडक्या बहि‍णींसाठी राज्य सरकारकडे मोठी मागणी केली आहे.
Supriya Sule, Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana
Supriya Sule, Devendra Fadnavis On Ladki Bahin YojanaSarkarnama
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीच्या यशात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याच्या शब्दावर आम्ही ठाम असल्याचं वक्तव्य महायुतीच्या नेत्यांकडून केलं जात आहे.

तर गुरूवारी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर खुद्द राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील आपण लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ही योजना अशीच चालू राहणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

"लाडकी बहीण योजना आम्ही सुरुच ठेवणार आहोत. तसंच 2100 रुपयेही आम्ही देणार आहोत. आता अर्थसंकल्पात आम्ही त्याचा विचार आम्ही करु," असं फडणवीस यांनी सांगितलं. त्यांच्या याच वक्तव्याचा आधार घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लाडक्या बहि‍णींसाठी राज्य सरकारकडे मोठी मागणी केली आहे.

आता नवीन वर्ष सुरु होत आहे. त्यामुळे डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यापासूनच लाडक्या बहि‍णींना 1500 ऐवजी 2100 रुपये द्यायला सुरूवात करा अशी मागणी सुळेंनी केली आहे. माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे की, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना महिन्याला 2100 रुपये देणार आहोत. मात्र, आमची मागणी आहे की आता नवीन वर्ष सुरू होत आहे.

Supriya Sule, Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana
Sanjay Raut : 'जरांगे नावाचे वादळ...' फडणवीसांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेताच राऊतांनी दिला इशारा, म्हणाले...

त्यामुळे आतापासूनच म्हणजे डिसेंबर महिन्यापासून महिलांना नवीन रक्कम म्हणजेच 2100 रुपये द्यायला सुरूवात करावी. पण आता डिसेंबर महिना सुरू झाला आहे. त्यामुळे शक्य असेल तर डिसेंबरपासूनच किंवा 1 जानेवारी 2025 पासून लाडक्या बहिणींच्या खात्यात महिना 2100 रुपये जमा करा. तसंच आमची मागणी तर 3 हजार रुपयांचीच आहे. कारण आम्ही सत्तेवर आलो असतो, तर लाडक्या बहिणींना महिना 3 हजार रुपये देणार होतो" असं त्या यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर ही योजना सुरु राहणार का याबाबत अनेक महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, महायुतीच्या नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत आम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करणार असल्याचं सांगितलं आहे. शिवाय काल शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाचं विधान केलं.

Supriya Sule, Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana
Sanjay Raut : संघर्ष, अपमान अन् अवहेलना पचवून ते पुन्हा मुख्यमंत्री झाले...; 'सामना'तून राऊतांनी फडणवीसांचं अभिनंदन केलं, पण...

फडणवीस म्हणाले, "लाडकी बहीण योजना आम्ही सुरुच ठेवणार आहोत. तसंच 2100 रुपयेही देणार आहोत. येणाऱ्या अर्थसंकल्पात त्याचा विचार करु. आम्ही जी आश्वासनं दिली आहेत ती सर्व पूर्ण करणार आहोत. मात्र, ज्या महिला निकषांबाहेर आहेत तरी त्यांना या योजनेचा लाभ मिळत असेल तर त्याचा पुनर्विचार होईल पण सरसकट पुनर्विचार केला जाणार नाही", असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com