E Sakal Comscore ranking 2026 : वाचकांचा विश्वास आणि 'ई-सकाळ'चा धडाका! मराठी डिजिटल विश्वात पुन्हा एकदा सिद्ध केलं आपलं वर्चस्व

E Sakal Comscore ranking 2026 : Comscore Ranking 2026 मध्ये दमदार कामगिरी करत ई-सकाळने मराठी डिजिटल विश्वात आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. महाराष्ट्रभरातील वाचकांचा वाढता विश्वास यामागे महत्त्वाचा घटक ठरला.
E Sakal Comscore ranking 2026
E Sakal Comscore ranking 2026Sarkarnama
Published on
Updated on

मराठी डिजिटल पत्रकारितेच्या विश्वात ‘ई-सकाळ’ने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. वाचकांचा वाढता प्रतिसाद आणि विश्वास यांच्या जोरावर या प्लॅटफॉर्मने अग्रस्थान मिळवत अनेक मोठ्या डिजिटल न्यूज पोर्टल्सना मागे टाकले आहे. सकाळ मिडिया समूहाच्या डिजिटल विभागाने सातत्यपूर्ण कामगिरी करत मराठी वाचकांसाठी विश्वासार्ह माहितीचे व्यासपीठ उभे केले आहे.

Comscoreच्या जानेवारी 2026 च्या अहवालानुसार esakal.com हा मराठीतील सर्वाधिक वाचला जाणारा डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म ठरला आहे. दर महिन्याला सुमारे 7.3 million सक्रिय वाचक या संकेतस्थळाला भेट देत असल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे. डिजिटल माध्यमात एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाचक जोडले जाणे हे मराठी पत्रकारितेसाठीही महत्त्वाचे यश मानले जात आहे.

आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात बातम्यांचा वेग खूप वाढला आहे. सोशल मीडियावर अनेकदा अप्रमाणित आणि दिशाभूल करणारी माहिती वेगाने पसरते. अशा परिस्थितीत वाचकांचा विश्वास टिकवणे हे कोणत्याही न्यूज प्लॅटफॉर्मसाठी मोठे आव्हान असते. मात्र ई-सकाळने पारंपरिक पत्रकारितेची मजबूत आणि आधुनिक डिजिटल तंत्रज्ञान यांचा योग्य संगम साधत विश्वासार्हतेची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

E Sakal Comscore ranking 2026
Taluka President Politics : 'तालुक्यात अध्यक्षपद नको रे बाबा!', आमदारांच्या 'त्या' भीतीमागचं नेमकं गुपित काय?

अचूक माहिती, जलद अपडेट्स आणि निष्पक्ष दृष्टीकोन या तीन महत्त्वाच्या घटकांवर ई-सकाळने विशेष भर दिला आहे. त्यामुळे वाचकांना ताज्या घडामोडींची माहिती वेगाने आणि विश्वासाने मिळते. राजकारण, अर्थव्यवस्था, देश-विदेशातील घटना, मनोरंजन, तंत्रज्ञान, आरोग्य, लाइफस्टाईल अशा विविध क्षेत्रांतील बातम्या येथे नियमितपणे प्रकाशित केल्या जातात. त्यामुळे विविध वयोगटातील वाचकांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारची माहिती उपलब्ध होते.

E Sakal Comscore ranking 2026
Baramati By Election : महाराष्ट्रातील 2 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचे पडघड : तयारी अंतिम टप्प्यात, आयोगाच्या घोषणेकडे लक्ष

या यशामागे विश्वासार्ह वार्तांकन हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. अफवा आणि चुकीच्या बातम्यांच्या गर्दीतही ई-सकाळने काटेकोर fact-checkingची पद्धत अवलंबली आहे. त्यामुळे वाचकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com