Ajit Pawar News: 'कार्यकर्त्यांना भेटायला आतूर...', अजितदादांची मिश्किल टिपण्णी, सगळेच खळखळून हसले

Ajit Pawar NCP Party Workers : अजित पवार यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते येऊन थांबले होते. पत्रकार परिषदे कधी संपते याची ते वाट पाहत होते. मात्र, पत्रकार परिषदेमध्ये एका प्रश्नामागून प्रश्न विचारणे सुरूच होते.
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News:उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जातात. भर स्टेजवर देखील ते आपल्या कार्यकर्त्यांना सुनावत असतात. मात्र, अजितदादांचे वेगळेच रूप नाशिकमध्ये पाहण्यास मिळाले. अजित पवार हे पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. तब्बल 40 मिनिटांपेक्षा अधिक वेळ ही पत्रकार परिषद सुरू होती. पत्रकरांच्या सगळ्याच्या प्रश्नाना अजित पवार उत्तर देत होते.

अजित पवार यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते येऊन थांबले होते. पत्रकार परिषदे कधी संपते याची ते वाट पाहत होते. मात्र, पत्रकार परिषदेमध्ये एका प्रश्नामागून प्रश्न विचारणे सुरूच होते. त्यामध्ये अजित पवारांना निरोप देण्यात आला की कार्यकर्ते त्यांची वाट पाहात आहेत.

Ajit Pawar
Devendra Fadnavis News : धस-मुंडे भेटीने काही फरक पडत नाही, बीड हत्या प्रकरणात मी खंबीर भूमिका घेतली आहे!

अजित पवारांना कार्यकर्ते वाटत पाहत आहेत, असे सांगितल्या बरोबरच त्यांनी तत्काळ प्रतिक्रिया देत भर पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, 'अजित पवार देखील कार्यकर्त्यांना भेटाया आतुर आहे पण काय करणार पत्रकारच सोडत नाहीत.' अजित पवारांच्या या टिपण्णी नंतर पत्रकारांसह तेथे उपस्थित असलेले पदाधिकारी, कार्यकर्ते देखील खळखळून हसले.

संदीप क्षीरसागरांच्या भेटीवर स्पष्टीकरण

संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांची गुप्त भेट घेतल्याने चर्चा सुरू होत्या. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, पाणीप्रश्नाबाबत संदीपने माझी भेट घेतली. बीड शहरात 21 दिवसाने पिण्याचे पाणी येते. 35 की 32 कोटीचे वीजबील थकल्याने त्यातून मार्ग काढून कनेक्शन सुरू करण्याच्या मागणीसाठी ते आले होते.

पालकमंत्रिपदाबाबत निर्णय मुख्यमंत्र्यांचा

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदाचा प्रश्न कधी सुटणार? असा प्रश्न विचारला जातो. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, पालकमंत्रिपदाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा आहे. ते त्याबाबत निर्णय घेतील.

Ajit Pawar
Shivsena Politics : शिंदेंच्या शिलेदाराच्या विधानानं बंडखोरीचे धुमारे; 'स्थानिक'साठी महायुती झाली तरी, 'एकला चलो रे'ची तयारी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Amol Mitkari, Ajit Pawar
Ajit Pawar Death Mystery
Ajit Pawar Accident Mystery | Amol Mitkari Claims
Sunetra Pawar
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com