Eknath Khadse Political Journey : एकनाथ खडसेंनी भरसभेतच सांगितला पहिल्या निवडणुकीचा किस्सा; अवघ्या एका मताने पराभव कसा झाला?

Eknath Khadse First Election News : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरमधील अमृत महोत्सव सोहळ्याप्रसंगी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
Eknath Khadse
Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : गेल्या 50 वर्षापेक्षा अधिककाळ माजी मंत्री एकनाथ खडसे हे सक्रिय राजकारणात आहेत. 1978 सालापासून ते राजकारणात आहेत. सातवेळा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आहे. दोन वेळा ते राज्य मंत्रिमंडळात मंत्री राहिले आहेत. त्यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिले. राजकारणातील सर्वाधिक काळ भाजपसोबत राहिले. या काळात त्यांना राजकारणातील चढ-उतार अनुभवाला आहे. त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगरमध्ये अमृत महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह नेतेमंडळी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी एकनाथ खडसे यांनी पहिल्या निवडणुकीत एक मताने पडल्याचा किस्सा भरसभेतच सांगितला.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरमधील अमृत महोत्सव सोहळ्याप्रसंगी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी खडसे म्हणाले,' राजकीय कारकिर्दीला सुरुवात करीत असताना ज्या काळी राजकारणात पाऊल ठेवले तो १९७५ सालाचा कालखंड आज आठवत आहे. कोथळीसारख्या एका छोट्या गावात माझा जन्म झाला. विधानसभेत मला सातत्याने निवडून देण्यात आले, 7 वेळा मला निवडून देण्यात आले. मंत्रिपद देखील मिळाले.'

1978 ला पहिल्यांदा कोथळी गावात ग्रामपंचायत निवडणुकीला उभा राहिलो, केवळ एक मताच्या फरकाने आमचे सर्व पॅनल पडले. मात्र, त्यानंतर आम्ही न थांबता लढत राहिलो. 1978 मध्ये अनेकांनी मला मदत केली आणि मला पुढे घेऊन गेले. डॉ. आचार्य यांच्यासोबत राहून हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे घेऊन गेलो. त्यानंतर या गावचा सरपंच, त्यानंतर पंचायत समिती सदस्य आणि 1990 मध्ये आमदार झालो, असे यावेळी खडसे यांनी स्पष्ट केले.

Eknath Khadse
Abdul Sattar: अब्दुल सत्तार महायुतीतूनच 'चेकमेट'! भुमरे-सावे-शिरसाट यांच्या चालीनं बदललं जिल्ह्याचं राजकारण

1990 मध्ये पहिल्यांदा आमदार झालो. त्यावेळी रामदास आठवले माझ्यासोबत होते. त्यासोबतच दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, आर. आर. पाटील ही मंडळी सोबत होते. विरोधी पक्षात राहून सुद्धा मला सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने मोठी मदत केली. त्या काळात विरोधी पक्ष एकमेकांना मदत करायचे. मात्र, व्यक्तिगत मतभेद तेव्हा नव्हते. अनेक वर्ष मी भाजपचे काम केले, असेही खडसे म्हणाले.

Eknath Khadse
Snap Election: पश्चिम बंगालनंतर भाजपचा पुन्हा मोठा प्लॅन! उत्तर प्रदेशसह चार राज्यांच्या होणार मुदतपूर्व निवडणुका? कारण...

आताचे राजकारण बदललय : खडसे

भाजपमध्ये काम करीत असताना स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर, गोपीनाथ मुंडे यांच्यासॊबतची माझी मैत्री महाराष्ट्राला माहीत आहे. 2000 ते 2014 पर्यंत भाजपचे सरकार नव्हते, मात्र कार्यक्रमांचा पाया भक्कम होता म्हणून हे भाजपला दिवस आले. प्रमोद महाजन यांनी मला बळकटी दिली. आताच राजकारण पाहून मला वेदना होतात. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचे राजकारण आताच राजकारण यात फार बदल झाला असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com