Eknath Khadse : मराठा आरक्षणावरुन खडसेंचा मोलाचा सल्ला; " फडणवीसांनी शब्द पाळावा,संकटमोचक महाजनांनी..."

Maratha reservation issue: मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे आवाहन माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केले.
Eknath Khadse
Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला असून जागोजागी त्यासाठी आंदोलन सुरुच आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोनवेळा उपोषण करीत लक्षवेधी लढा उभारलेले मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रभर दौरा करत ठिकठिकाणी भेटी देत आहेत. त्यामुळे आरक्षण प्रश्नावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेला शब्द पाळावा. संकटमोचक गिरीश महाजन यांनी मार्ग काढून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे आवाहन माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केले.

Eknath Khadse
Marathwada Water Issue : उद्या पाणी सोडा, नाहीतर मराठवाडा बंद करू ...

हदयविकाराचा त्रास झाल्याने एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर मुंबई येथे उपचार करण्यात आले. मुंबईवरून परतल्यावर ते मुक्ताईनगर येथे गेले. प्रथमच ते जळगाव येथे आले असता कार्यकर्त्यांनी त्यांचे फटाके फोडून जल्लोषात स्वागत केले. जळगावातील निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

भुजबळांनी कायम ओबीसीसाठी लढा दिला

छगन भुजबळ यांनी ओबींसीचे प्रश्‍न सातत्याने आयुष्यभर मांडले. त्यांनी ओबीसीचे कायमस्वरूपी समर्थन केलेले आहे. त्यांची भूमिका आजची नाही. त्यांनी ओबीसीसाठीच लढा दिला आहे. हे सगळ करीत असताना मराठा समाजाविषयी द्वेषाची भावना असण्याचे काही कारण नाही. आपल्या समाजाविषयी आदर बाळगला पाहिजे, असेही खडसे म्हणाले.(Maratha Reservation)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आरक्षणाबाबत शासनाने भूमिका घ्यावी

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण देण्याची मुदत दिली आहे. सरकारनेच मराठा समाजाला निर्णय घेतो, असे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळेस दिले होते. त्यामुळे मराठा समाजाच्या अपेक्षा निश्‍चीत उंचावलेल्या आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत शासनाने भूमिका घेणे गरजेचे आहे, असेही खडसे म्हणाले.

फडणवीस, महाजनांनी मार्ग काढावा

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले होते. जर मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर आपण राजकारण सोडून देऊ, असा शब्द त्यांनी दिला होता. त्यामुळे आता त्यांनी तो शब्द पाळावा, तर संकटमोचक असलेले राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आरक्षण देण्याबाबत मार्ग काढावा, असे आवाहनही खडसे यांनी केले.

(Edited by Sachin Waghmare)

Eknath Khadse
Girish Mahajan vs Eknath Khadse : खडसेंची चोरी उघड झाली; महाजनांनी ते संपूर्ण प्रकरणच सांगून टाकलं!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com