Eknath Shinde Video : विधानसभेतील विजयानंतरही एकनाथ शिंदे स्वस्थ बसेनात, राज्यभर दौरा करणार?

Eknath Shinde Begins Abhar Daura in Kolhapur : उद्धव ठाकरेंसोबत असलेले शिवसैनिक आपल्याकडे आणण्याचे प्रयत्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करणार असल्याची शक्यता आभार दौऱ्यात आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बंपर यश मिळाले. महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला विरोधीपक्ष नेतेपदावर दावा सांगता येत नाही, येवढी त्यांची घसरण झाली. विरोधकच शिल्लक राहिले नसल्याने महायुतीमधील पक्ष आरामाच्या मुडमध्ये असतील, अशी शक्यता होती. मात्र, निकालाच्या अवघ्या दीड महिन्यात शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे "अॅक्शन मोड'वर आहेत.

एकनाथ शिंदे कोल्हापूरपासून 'आभार यात्रा' सुरू करणार आहेत. अंबाबाईचे दर्शन घेऊन ते यात्रेला सुरुवात करतील. ही यात्रा पुढील दीड महिना चालणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने शिवसेनेकडून पुन्हा एकदा महाराष्ट्र पिंजून काढण्यात येणार आहे.

एकनाथ शिंदे यांचे प्रमुख स्पर्धक उद्धव ठाकरे यांची विधानसभा निवडणुकीत मोठी पिछेहाट झाली आहे. त्यामुळे या यात्रेनिमित्त शिंदे प्रत्येक जिल्ह्यातील आपले संघटन मजबूत करतील. उद्धव ठाकरेंसोबत असलेले शिवसैनिक देखील आपल्याकडे आणण्याचे प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde
Santosh Deshmukh Murder Case : सरपंच देशमुख हत्या; तपासाची दिशा आरोप-प्रत्यारोपांमुळे भरकटणार?

निवडणुकीची तयारी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेची ताकद वाढवण्याचा शिंदे यांचा प्रयत्न आहेत. त्यासाठी आभार यात्रेमुळे शिवसैनिक पुन्हा लोकांमध्ये जातील आणि त्याचा फायदा शिवसेनेला निवडणुकीमध्ये होण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणूक स्वबळावर?

आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार की स्वबळावर हे स्पष्ट झाले नाही. भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आगामी निवडणुका महायुतीत लढायची की नाही याचा निर्णय वरिष्ठ घेतील असेल म्हटले आहे. तर, एकनाथ शिंदे यांच्या शिवेसेनेमध्ये पुढील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका महायुतीमध्ये एकत्र लढायची चर्चा आहे.

Eknath Shinde
Saif Ali Khan attack : अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री योगेश कदमांचे मोठे विधान; म्हणाले, 'घटनेमागे अंडरवर्ल्ड टोळी...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com