Eknath Shinde Politics : 'काही जणांनी लवंगी फटाके फोडले, आता आमचा एटम बाॅम्ब फुटेल', शिंदेंनी ठाकरेंना डिवचले

Eknath Shinde Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
Uddhav-Thackeray-Eknath-Shinde
Uddhav-Thackeray-Eknath-ShindeSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News : अतिवृष्टीमुळे शेतकरी चिंतेत असताना उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरला हंबरडा मोर्चा काढून सरकारला इशारा दिला. त्यांच्या या इशाऱ्याची खिल्ली एकनाथ शिंदेंनी आपल्या मराठवाड्यातील दौऱ्यात उडवली.

ते म्हणाले, 'काही दिवसांपूर्वी इथे येऊन काही जण लवंगी फटाके वाजवून गेले मात्र पालिका निवडणुकीत आमचा एटम बॉम्ब फुटेल आणि विरोधकांचे काम तमाम झालेले तुम्हाला दिसेल.'

'शिवसेना ही कायम गरजवंतांच्या मदतीला धावून जाणारा पक्ष आहे. कोणतेही संकट असले तरी तेव्हा मदतीसाठी एकनाथ शिंदे सगळ्यात पुढे असतो. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असताना हे अश्रू थेट त्यांच्या बांधावर जाऊन पुसण्याचे काम शिवसेनेने केले आहे.', असे देखील ते म्हणाले.

शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, मेळाव्याला मुंबईत न येता आपतग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन मी शिवसैनिकांना केले होते. त्यानुसार त्यांनी शेतकऱ्यांच्या घरात जाऊन त्यांचे घर पुन्हा उभे करण्यासाठी त्यांना मदत केली, तसेच त्यांना मदत साहित्य देऊन त्यांना आधार दिला.

Uddhav-Thackeray-Eknath-Shinde
BJP Election Strategy : ZP साठी भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; उमेदवार निवडीसाठीची प्रोसेस तयार

पालकमंत्र्यांची मदत

शिंदे म्हणाले, धाराशिव जिल्ह्यातील ज्या साडेसांगवी गावातील मुलींनी माझ्याकडे शाळेत जाण्यासाठी सायकलची मागणी केली होती, ती मागणी मी तात्काळ पूर्ण केली. तसेच धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी त्याच गावात जाऊन स्थानिकांना मदत देत दिवाळी साजरी केली. तसेच या गावातील ज्या शेतकऱ्यांनी माझ्याकडे गावाला जोडणारा नदीवरचा पूल मोठा करण्याची मागणी केली होती, त्याचे भूमिपूजन देखील झाले.

Uddhav-Thackeray-Eknath-Shinde
NCP Sharad Pawar Politics: भाजपच्या वाटेवरील उदय सांगळे म्हणतात, सिन्नरला सर्व गटांत उमेदवार देणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com