Eknath Shinde Shiv Sena conflict : शिवसेनेत बंडाळीची चाहूल? गोऱ्हे-कडूंच्या नावांवरून तणाव, शिंदे काय खेळी करणार?

Internal dissent rises in Shiv Sena as leaders oppose Neelam Gorhe and Bachchu Kadu names for Legislative Council nomination : विधान परिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे शिवसेनेकडून चर्चेत असलेल्या नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांच्या नावाला शिवसेना नेत्यांकडून विरोध होताना दिसतो आहे.
Eknath Shinde Shiv Sena conflict
Eknath Shinde Shiv Sena conflictSarkarnama
Published on
Updated on

MLC election Maharashtra : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक, तर एका जागेची पोटनिवडणूक होईल. या निवडणुकीत महायुतीच्या वाट्याला नऊ जागा आहेत. यात एकनाथ शिंदे शिवसेना दोन जागा मिळत आहेत.

या दोन्ही जागांसाठी एकनाथ शिंदे शिवसेनेकडून आठ जणांची नावे समोर येत असताना, त्यातील नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांच्या नावाला आता शिवसेनेतून विरोध सुरू झाला आहे. विशेष म्हणजे, या दोघांची नावे शिवसेनेतून आघाडीवर आहे. या विरोधावर एकनाथ शिंदे कशी मात करतात अन् निर्णय घेण्यासाठी कोणती खेळी करतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.

विधान परिषदेसाठी एकनाथ शिंदे शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे, रविंद्र फाटक, संजय मोरे, किरण पावसकर, शीतल म्हात्रे, शायना एनसी, दिपक सावंत, बच्चू कडू (Bachchu Kadu) या आठ जणांची नावे चर्चेत आहे. बच्चू कडू यांनी अलीकडेच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे त्यांचे नाव आघाडीवर आहे. नीलम गोऱ्हे या विधान परिषदेवर उपसभापती आहेत.

नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू या दोघांच्या नावाला आता एकनाथ शिंदे शिवसेनेतील (Shivsena) नेत्यांकडून विरोध होऊ लागला आहे. नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी, असे या नेत्यांचे म्हणणे आहे. बच्चू कडू यांच्या नावाला विरोध करताना, विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर महायुती सरकारविरोधात घेतलेली भूमिका आणि शिवसेना फुटीवर केलेल्या भाष्यांचा संदर्भ दिला जात आहे.

Eknath Shinde Shiv Sena conflict
Vivek Kolhe MLC : 'पक्षाचा शब्द अंतिम!' विवेक कोल्हेंचा मार्ग मोकळा? बावनकुळेंनी पत्ते उघडले!

बच्चू कडू यांचा शिवसेनेशी काहीच संबंध नाही. तरी देखील शिवसेनेकडून विधान परिषदेची त्यांना उमेदवारी द्यायचीच असेल, तर त्यांनी त्यांची प्रहार जनशक्ती संघटना ही शिवसेनेत विलीन करावी, अशी अट ठेवावी. ही अट मान्य असेल, तरच त्यांना विधान परिषदेला शिवसेनेकडून संधी द्यावी. शिवसेना नेत्यांच्या या प्रस्तावावर अजून खुलेपणाने चर्चा झालेली नाही. तसंच बच्चू कडू हा प्रस्ताव गेला आहे की नाही, हे देखील पुढे आलेले नाही.

Eknath Shinde Shiv Sena conflict
Prajakt Tanpure Rahuri Bypoll Result : मतदानाचा घसरलेला टक्का, प्राजक्त तनपुरेंचा समर्थकांना 'तो' निरोप; निकालाआधीच राहुरीत 'धडधड' वाढली!

बच्चू कडू यांच्याकडून यावर अजून प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच नीलम गोऱ्हे यांच्या जागेवर नवीन चेहऱ्याला संधी द्यावी. राज्यसभेवर जसा आक्रमक आणि नवीन चेहरा देण्यात आला आहे, तसाच प्रयोग विधान परिषदेवर करावा, अशी मागणी शिवसेना नेत्यांनी केली आहे. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांचा विधान परिषदेचा मार्ग अवघड बनला आहे.

नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू या दोन्ही नावांना शिवसेनेतून प्रचंड विरोध असल्याचे कळते. विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत शिवसेना विधान परिषदेवर कोणाला पाठवणार, हे समोर येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com