BJP News : निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच एकनाथ शिंदेंनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्रातील तापलेला मुद्दा पंतप्रधानांच्या कानावर घातला

Political News : राज्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक राज्यात लवकरच येणार असल्याची माहिती या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी दिली.
Eknath Shinde Narendra Modi
Eknath Shinde Narendra Modisarkarnama
Published on: 
Updated on: 

Dehli News : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (५ ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीवेळी विविध विषयावर या दोन नेत्यांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाली. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे एकनाथ शिंदे यांनी केंद्राकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक राज्यात येत आहे. हे पथक सर्वेक्षण करणार असल्याची माहिती या भेटीनंतर बोलताना एकनाथ शिंदे यांनी दिली.

एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. मी पंतप्रधानांसोबत महाराष्ट्रातील दुष्काळासंदर्भात बोललो आहे. ते महाराष्ट्राला जमेल तशी मदत करणार आहेत, असे आश्वासन मोदींनी दिले. माझी त्यांच्यासोबत चर्चा होत आहे. महाराष्ट्रातील दुष्काळाची माहिती पीएम मोदी यांनी यावेळी मागवून घेतली आहे.

केंद्राचे पथक महाराष्ट्रात येणार

राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्रात येणार आहे. हे पथक दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून परिस्थितीचे सर्वेक्षण करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या पाहणीनंतर केंद्राकडून महाराष्ट्राला किती आणि कोणत्या स्वरूपात मदत मिळते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Eknath Shinde Narendra Modi
BJP Politics : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मुस्लिम चेहरा; नितीन नवीन यांच्या टीममधील 'या' चेहऱ्याची तुफान चर्चा!

या भेटीदरम्यान राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींवर चर्चा झाली असल्याची माहिती आहे. त्यातही या दोन्ही नेत्यांच्या भेटीत संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चा झाली असल्याचे सांगितले जाते. शिवाय येत्या काळात राज्यात विधानपरिषदेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवरही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. मात्र याबाबत भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.