Eknath shinde : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून राज ठाकरेंना निमंत्रण; पुन्हा एकदा चर्चेला उधाण !

Shiv Sena invitation news : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील मनसे प्रमुख राज ठाकरे यांना जेवणाचे निमंत्रण दिले आहे.
Raj Thackeray Eknath shinde
Raj Thackeray Eknath shinde sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : हिंदी भाषेच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्रित आले आहेत. मनसे-उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने एकत्र येत मेळावा साजरा केला. त्यामुळे येत्या काळात होत असेलल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधू युती करतील अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे सर्वांनाच याची उत्सुकता लागून राहिली आहे.

सोमवारी सकाळी रंगशारदा सभागृहात पार पडलेल्या मेळाव्यात मनसे-उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची (Shivsena) एकत्र येण्याची काळजी करू नका, योग्यवेळी घोषणा केली जाईल, असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्पष्ट केले असतानाच आता दुसरीकडे आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील मनसे प्रमुख राज ठाकरे यांना जेवणाचे निमंत्रण दिले असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. त्यामुळे आता सर्वानाच उत्सुकता लागली आहे.

Raj Thackeray Eknath shinde
Raj-Uddhav Thackeray: ठाकरे बंधुंच्या युतीचा सस्पेन्स संपला! राज ठाकरेंचे मोठे विधान, म्हणाले 20 वर्षानंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो तर....'

एकीकडे तब्बल वीस वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देखील दिल्या, त्यामुळे गेल्या काही दिवसातील घडामोडी पहिल्या तर ठाकरे बंधूंमध्ये जवळीक वाढत असल्याचे दिसत आहे. आगामी निवडणुकांसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे.

Raj Thackeray Eknath shinde
NCP SP News : "गद्दारी केलेल्या एक एकाला घरी पाठवणार"; अ‍ॅक्टिव्ह होताच शरद पवारांची वाघिण कडाडली!

येत्या काळात मनसे आणि शिवसेना यांची युती होणार की नाही हे वेळ सांगेल? कारण एकीकडे त्यांचे उद्धव ठाकरेंशी बोलणे सुरू आहे, दुसरीकडे आम्ही सुद्धा त्यांना जेवणासाठी निमंत्रण दिले आहे. आम्ही त्यांच्याकडे गेलो तर एक पद्धत असते की त्यांना आम्ही सुद्धा निमंत्रण दिले पाहिजे. त्यामुळे त्यांना आम्ही सुद्धा निमंत्रण दिले आहे, ते कधी येतात याची आम्ही वाट पाहत आहोत. एक, दोन दिवसांमध्ये एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा करू, असे देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

Raj Thackeray Eknath shinde
BJP Politics : कल्याण-डोंबिवलीत भाजप ठाकरेंना धक्का देणार! शिंदेंचीही अडचण वाढवणार; इन्कमिंग सुरू, महापौरपदासाठी स्वबळाचे संकेत

दरम्यान, आमदार परिणय फुके यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना शिंदे गट चांगलाच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. भंडारा येथे बोलताना परिणय फुके यांनी शिवसेनेबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते, यावर देखील शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परिणय फुके यांनी जे वक्तव्य केले आहे, ते योग्य नाही, येथे कोणी कोणाचा बाप नाहीये, सगळे समान आहेत, महायुतीमध्ये तीन पक्ष मिळून सरकार चालवत आहेत, त्यामुळे कोणी कोणाचा बाप काढू नये, असेही देसाई म्हणाले.

Raj Thackeray Eknath shinde
Raj-Uddhav Thackeray: ठाकरे बंधुंच्या युतीचा सस्पेन्स संपला! राज ठाकरेंचे मोठे विधान, म्हणाले 20 वर्षानंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो तर....'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com