Jyoti Waghmare : जाब विचारणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या महिला नेत्याची फजिती, जिल्हाधिकाऱ्यांनी झापलं

Jyoti Waghmare Clashes with Solapur Collector : नुकसानग्रस्त गावकऱ्यांना करायच्या मदतीवरून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि शिवसेना प्रवक्ता ज्योती वाघमारे यांच्यातील संभाषण समोर आले आहे.
Eknath Shinde  Jyoti Waghmare
Eknath Shinde Jyoti WaghmareSarkarnama
Published on
Updated on

Jyoti Waghmare News : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. राजकीय नेत्यांच्या दौऱ्यानंतर देखील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून नेत्यांना मदत करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कीट घेऊन गेलेल्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी फोन करत मदतीविषयी विचारणा केली.

ज्योती वाघमारे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना म्हणाल्या की, अन्नाचे पाकीट मिळाले पाहिजे.त्यावर आशीर्वाद यांनी सरकारकडून अन्नधान्याची मदत केली जात असल्याची माहिती दिली. मात्र, अन्नाची पाकीटे मिळाली पाहिजे असे वाघमारे वारंवार सांगत होत्या. तसेच आपण देखील येथे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी म्हटले.

त्यावर तुम्ही देखील मदत करा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सूचवले असता आपण मदत करण्यासाठीच आलो असल्याचे वाघमारे यांनी म्हटले. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिप्रश्न करत मदतीचे किती कीट आणले, अशी विचारणा केली. त्यावेळी जेवणाची नाही, अन्नधान्याची कीट घेऊन आलो असल्याचे त्यांनी म्हटले.

Eknath Shinde  Jyoti Waghmare
RSS dismissal demand Nagpur : शताब्दी वर्ष साजरा करणाऱ्या 'RSS'ची खोडी; हर्षवर्धन सपकाळांची मोठी मागणी

पण नेमके किती कीट आणले, असा जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिप्रश्न केला असता आम्ही 200 कीट आणल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तीन हजार लोक आहेत तुम्ही 200 लोकांचं कीट आणलंय, कशी मदत होईल हे मला सांगा? असे म्हणत वाघमारेंना झापले.

शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले की, शेल्टर होममध्ये मदत करतो आहोत. प्रत्येक कुटुंबाला दहा किलो तांदूळ, दहा किलो गहू देत आहोत. दोन तीन दिवसांमध्ये खात्यावर पाच हजार रुपये जमा केले जातील.

Eknath Shinde  Jyoti Waghmare
Yashwant Sugar Factory: 'यशवंत'च्या सभेत पुन्हा गोंधळ; अवघ्या पाच मिनिटात गुंढाळला गाशा; नेमकं काय घडलं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com