Sanjay Shirsat : “पैसा काय आपल्या बापाचा...” महायुतीत खळबळ उडवणाऱ्या वक्तव्याचं खरं कारणं शिरसाटांनी आणलं समोर

Sanjay Shirsat Black and White Interview : महायुतीचे सरकार आले असून अनेक नेते सध्या अडचणीत आले आहे. ज्यात मंत्री संजय शिरसाट यांचाही समावेश आहे.
Sanjay Shirsat
Sanjay Shirsat Sarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. मंत्री संजय शिरसाट यांनी सामाजिक न्याय विभागाच्या निधीच्या वळवणीवरून अजित पवारांवर टीका केली होती, ज्यामुळे महायुतीतील वाद निर्माण झाला.

  2. 'ब्लॅक अॅण्ड व्हाईट' या समा टीव्हीवरील कार्यक्रमात त्यांनी स्पष्ट केलं की त्यांनी फक्त सत्य मांडलं आहे.

  3. त्यांनी सांगितलं की यामुळे महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही, आणि नाराजी नव्हती, फक्त वस्तुस्थिती सांगितली होती.

Mumbai News : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट गेल्या काही दिवसापासून चांगलेच चर्चेत आहेत. त्यांचा बेडरूममधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांची विकेट जाईल, असे बोलले जात होते. तसेच मध्यंतरीही त्यांनी त्यांच्या सामाजिक न्याय मंत्रालयातील निधी इतरत्र वळवल्यावरून अजित पवार यांच्यावर टीका केली होती. ज्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवारांची त्यांनी नाराजी ओढावून घेतली होती, पण आता 'साम'वरील 'ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट' कार्यक्रमात शिरसाट यांनी आपल्या नाराजीबद्दल प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी फक्त जे सत्य सांगितलं. पण याचा परिणाम महायुतीवर होईल किंवा मी नाराज आहे असे होत नाही. (Sanjay Shirsat’s criticism on Ajit Pawar over diverted social justice ministry funds and clarification in Sama)

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी नुकताच अकोल्यात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी, निधी मागा, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातायं? असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे महायुतीत खळबळ उडाली होती. तर विरोधकांनी यावरून सरकारवर जोरदार टीका केली होती. शिरसाट यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटल्यानंतर त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होता. ज्यानंतर फडणवीस यांनाच याची देखल घ्यावी लागली होती. तर शिरसाट यांचे कानटोचले होते. तसेच बोलताना काळजी घ्या असे म्हटले होते.

Sanjay Shirsat
Sanjay Shirsat controversy : सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचे काय जातेय? संजय शिरसाटांचे पुन्हा वादग्रस्त विधान

दरम्यान काही दिवसांपूर्वीच शिरसाट यांच्या बेडरुमधील व्हिडीओमुळे वाद निर्माण झाला होता. ज्यामध्ये पैशांची बॅग दिसत होती. पण तो मॉर्फ असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्याआधी लाडकी बहीण योजनेवरून देखील त्यांनी नाराजी व्यक्त करताना, सामाजिक न्याय विभागाचा पैसा वळवला म्हणत त्यांनी अजित पवारांवर टीका केली होती. त्यावरून देखील शिरसाट यांनी फडणवीसांसह अजित पवारांची नाराजी ओढावून घेतली होती.

यावरून आता शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मी नाराज नव्हतो, आताही नाराज नाही. पण काही वेळा परिस्थिती अशी निर्माण होते की आपल्या वरिष्ठांना सत्य सांगावं लागतं. त्यांच्या कानावर त्या गोष्टी घालाव्या लागतात. अशा वेळी माणूस जरा इमोश्नल होतो. पण याचा अर्थ तो महायुतीच्या विरोधात आहे असा मुळीच होत नाही.

तर एखादी गोष्ट मागायची पद्धत असते. आपण घरी देखील तशी मागणी कधी शांत राहून तर कधी ओरडून करतो. तर कधी लाडाने करतो. हा त्यातलाच एक प्रकार आहे. मात्र या गोष्टीत नाराजी आणि महायुतीत नाराजी आहे असे म्हणण्यासारखं काही संबंध नाही.

हे महायुतीचे सरकार राज्यात आणण्यासाठी आम्हीच तर प्रयत्न केला. आम्ही सर्वांनी मिळूनच ते आणलं. मात्र आपल्याच सरकारमध्ये आपल्याच मित्र पक्षाकडून कुरघोडी करणे, एकमेकांवर नाराज होणे, यामुळे जनतेतं चुकीचा मॅसेज जातो. लोक आपल्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात. त्यांचाही असा समज होती की हे सत्तेसाठी हापापलेलं होते. असा समाज होण्याची शक्यता निर्माण होते.

याची बातमी झाली पण त्याचा परिणाम महायुतीवर झाला नाही. त्यासाठी आम्ही देखील समजून घेतलो. खुपच बोलू नये यासाठी प्रयत्न केले. शांत राहिलो. यामुळे आता महायुतीत सर्व काही अलबेल झालं आहे.

Sanjay Shirsat
Sanjay Shirsat News : मला मंत्रीपद मिळू नये यासाठी अनेकांचे प्रयत्न, आताही ते टिकेल की नाही ? हे शिंदे-फडणवीस ठरवतील!

FAQs :

प्र.1: संजय शिरसाट यांनी अजित पवारांवर नेमकी कोणती टीका केली?
उ: त्यांनी सामाजिक न्याय मंत्रालयाचा निधी इतरत्र वळवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली व त्याबद्दल अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली.

प्र.2: ‘ब्लॅक अँड व्हाईट’ कार्यक्रमात त्यांनी काय स्पष्टीकरण दिलं?
उ: त्यांनी सांगितलं की त्यांनी फक्त सत्य मांडलं असून, याचा महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही.

प्र.3: यामुळे महायुतीत तणाव निर्माण झाला आहे का?
उ: काहीसा वाद झाल्याचं दिसत असलं तरी शिरसाट यांनी याचा आघाडीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com