Eknath Shinde : भेसळखोरांवर थेट मोक्का! एकनाथ शिंदेंचा तुकाराम मुंढेंना फ्री हँड; लीगल टीमही तयार होणार!

Eknath Shinde-Tukaram Mundhe Meeting : भेसळीच्या प्रकरणांमधील कायदेशीर प्रक्रिया अधिक बळकट करण्यासाठी विशेष पावले उचलण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
Eknath Shinde-Tukaram Mundhe Meeting
Eknath Shinde-Tukaram Mundhe Meetingsarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News : नागरिकांच्या आरोग्याशी आणि विशेषतः लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या दूध, दुग्धजन्य पदार्थ भेसळखोरांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावेत, अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

मंत्री तसेच उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, विधी व न्याय विभागाचे सचिव उदय शुक्ला, अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिंदेंनी हे आदेश दिले.

भेसळीच्या प्रकरणांमधील कायदेशीर प्रक्रिया अधिक बळकट करण्यासाठी विशेष पावले उचलण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या. ज्यांच्यावर कारवाई होते, त्यांच्या खटल्यांचे कामकाज न्यायालयात सुरू असताना कोणतीही कायदेशीर त्रुटी उरता कामा नये. यासाठी नामवंत व ज्येष्ठ विधीतज्ज्ञांची मदत घेण्यात यावी आणि यासाठी तातडीने एक विशेष लीगल टीम तयार करण्यात यावी, असेही यावेळी त्यांनी सुचित केले.

Eknath Shinde-Tukaram Mundhe Meeting
Shiv Sena case : एकनाथ शिंदेंसह 31 आमदारांचे सूरत, गुवाहाटीला जाणे योगायोग नव्हता..! सुनावणीदरम्यान ठाकरेंची बाजू मांडताना सिब्बलांनी धडाधड सोडले 'बाण'

एफडीएकडून सादरीकरण

विकसित महाराष्ट्र - २०४७' अंतर्गत सन २०२६-२७ या वर्षासाठी विभागासाठी निश्चित करण्यात आलेले टप्पे व त्यांच्या पूर्ततेसाठी करण्यात येत असलेली कार्यवाही संदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेण्यात आली. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने सादरीकरण करण्यात आले.

Eknath Shinde-Tukaram Mundhe Meeting
Shivsena UBT : 'ऑपरेशन टायगर'ला चोख प्रत्युत्तर; उद्धव ठाकरेंच्या नव्या रणनीतीची एकनाथ शिंदेंना धास्ती, उचलले मोठे पाऊल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com