Mumbai News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार फोडत काही दिवसापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ऑपरेशन टायगर राबवले आहे. त्यानंतर चार दिवसातच आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सचिन अहिर यांना विधानपरिषदेच्या उपसभापतिपदाची संधी दिली. त्यामुळे उद्धव ठाकरेंना धक्यावर धक्के दिले जात आहेत. त्यातच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर पुन्हा एकदा राबवत आमदार फोडले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी ठाकरे सेनेच्या सर्व आमदारांची मातोश्रीवर बैठक बोलवली आहे.
गेल्या दहा दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंना धक्यावर धक्के दिले जात आहेत. विशेषता त्यांचे लोकसभेतील सहा खासदार फोडून शिंदेंनी त्यांच्या पक्षाची दिल्लीतील ताकद मोठ्या प्रमाणात वाढवली आहे.
त्यासोबतच विधानपरिषदेच्या उपसभापतिपदाच्या निवडणुकीवेळी मोठी खेळी करीत त्यांनी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सचिन अहिर यांना संधी देत जवळ केले आहे. येत्या काळात उद्धव ठाकरेंचे विधानसभेतील १४ आमदार संपर्कात असल्याचे शिंदे यांच्या शिवसेनेकडून सांगितले जात आहे.
त्यामुळे गेल्या आठवड्यातच उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांची बैठक बोलवली होती. यावेळी चार आमदार कामानिमित्ताने गैरहजर होते. मात्र, त्यानंतर अधिवेशन काळातच पुन्हा एकदा आमदारही फुटणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सायंकाळी सात वाजता सर्व आमदारांची मातोश्रीवर बैठक बोलवली आहे. या बैठकीत ते सर्वांना मार्गदर्शन करणार असल्याचे समजते.
त्यासोबतच यावेळी आमदारांना कानमंत्र देणार असल्याचे समजते. या पुढील काळातही आमदार फोडण्याची शक्यता गृहीत धरून उद्धव ठाकरे आमदारांना काय सूचना देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासोबतच या बैठकीला किती आमदार उपस्थित राहणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.