Eknath Shinde News: 'एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, मात्र...'; काँग्रेस नेते हुसैन दलवाई यांचं मोठं विधान

Eknath Shinde Politics: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते, सोनिया गांधी यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदिलही दाखवला होता. परंतु, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यामुळे हा पक्षप्रवेश होऊ शकला नसल्याचा दावा चव्हाण यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Eknath-shinde
Eknath-shindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते, सोनिया गांधी यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदिलही दाखवला होता. परंतु, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यामुळे हा पक्षप्रवेश होऊ शकला नसल्याचा दावा चव्हाण यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याचदरम्यान, आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतही एक काँग्रेस नेत्यानं मोठा गौप्यस्फोट केला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसैन दलवाई यांनी एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, मात्र त्यांचा प्रवेश होऊ शकला नसल्याचं विधान करत पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. दलवाई यांनी यावेळी शिंदेंच्या काँग्रेस प्रवेशावर अधिकचं भाष्य करणं टाळलं आहे. मात्र,त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यावर शिंदे किंवा त्यांच्या शिवसेनेकडून कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाही.

मात्र, काँग्रेस नेते हुसैन दलवाई यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडेंबाबत केलेला दावा खरा असल्याचं ठामपणे सांगितलं आहे. यावर ते म्हणाले, गोपीनाथ मुंडे हे भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, सगळं ठरलं होतं.

गोपीनाथ मुंडे हे त्यावेळी सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी निघाले होते. मात्र,तेवढ्यात त्यांना अहमद पटेल यांचा फोन आला.त्यांनी फोनवरच तुम्ही आधी राजीनामा द्या आणि नंतर निवडून या अशी काँग्रेस पक्षप्रवेशासाठी अट त्यावेळी अहमद पटेल यांनी त्यांच्यासमोर ठेवली. त्याचमुळे मुंडे यांचा काँग्रेस प्रवेश होऊ शकला नाही. मला वाटतं ही काँग्रेसची सर्वात मोठी चूक असल्याचं सांगितलं आहे.

Eknath-shinde
Navnath Waghmare: "मराठा समाजाच्या महिलांची कान धरुन माफी मागायला तयार पण..."; नवनाथ वाघमारेंच्या जरांगेंबाबतच्या शर्तीमुळं वाद आणखी चिघळणार

पृथ्वीराज चव्हाण यांनी हुसेन दलवाई यांच्या एकनाथ शिंदेबाबत केलेल्या वक्तव्य भाष्य केलं. ते म्हणाले, हा नवीन विषय असल्याचं म्हटलं. एकनाथ शिंदे आणि आमची चर्चा झाली होती. मात्र काय झाली ते सांगणार नाही, असंही चव्हाण यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे आमचे मित्र आहेत, ते आमचं काम करत नाहीत. मात्र, आजही आमचे मित्र आहेत. ते आमच्या जिल्ह्यातले आहेत. आमच्या अनेक गाठीभेटी झाल्या होत्या. मात्र, त्यावर मी काही बोलणार नसल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगत शिंदेंविषयीच्या काँग्रेसबाबतच्या दाव्याबाबतचा सस्पेन्स वाढवला आहे.

Eknath-shinde
MLA Rajesh Pawar News : सत्ता भाजपची, पण नांदेड महापालिका आमदाराच्या पत्राची दखलच घेईना; राजेश पवार करणार प्रशासनाचा हिशोब चुकता!

माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी सोमवारी(ता.17) परळीमधूनच मोठा गौप्यस्फोटा केला आहे. त्यांनी 2004 ते 2014 या कालावधीमध्ये गोपीनाथ मुंडे यांची भारतीय जनता पक्षात होणारी घुसमट मी जवळून पाहिल्याचं त्यांनी सांगितलं.

शेट्टी म्हणाले, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार सत्तेत आणण्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा होता, तितकाच गोपीनाथ मुंडेंचाही होता. राज्यासह देशभरात युतीचे सरकार आले. 2014 नंतर पंतप्रधान मोदी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची रचना सुरू होती. मात्र, मंत्रिमंडळाच्या रचनेसंदर्भात गोपीनाथ मुंडे यांना मोदी सरकारच्या शिष्टमंडळाकडून संपर्क होईल, अशी अपेक्षा होती. शपथविधीला देखील तात्काळ आमंत्रण मिळेल, असा विश्वास मुंडे यांना होता.

Eknath-shinde
Pune Mayor Bungalow: ‘रामदूत’ला विरोध; शरद पवारांच्या NCPकडून ‘शिवनेरी’ची मागणी; पुण्यात 'महापौर' निवासाच्या नामकरणावरून पेटला राजकीय वाद

मात्र, बराच कालावधी लोटाला पण निरोप न आल्याने मुंडे यांची अस्वस्था वाढली होती. ती अस्वस्थता मी जवळून पाहिली. त्यांनी काही गोष्टी बोलून दाखवल्या. शेवटी त्यांची सहनशक्ती संपली होती. त्यांच्या संयमाचा अंत पाहिला आणि शेवटच्या क्षणी त्यांना निरोप देण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com