Maharashtra Politics : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत! ठाकरेंच्या नेत्यानेच सांगितलं कारण

Eknath Shinde Sanjay Raut : एकनाथ शिंदेंचा वापर फक्त शिवसेना फोडण्यासाठी केला गेला. आता त्यांचे काम संपले आहे, असा दावा करत ते पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut News : एकनाथ शिंदे हे पुन्हा या राज्याचे मुख्यमंत्री होणार नाहीत. शिवसेना फोडण्यासाठी केवळ त्यांचा वापर केला गेला आणि त्याची बक्षीसी म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले होते. आता त्यांचा कार्यभाग संपला आहे," असा जोरदार हल्लाबोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मराठी स्वाभिमानी आणि हिंदुत्ववादी शिवसेना फोडणे हाच यामागचा मुख्य हेतू होता. तो हेतू साध्य झाल्यावर आता शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची भाजपची कोणतीही योजना नाही, कारण बाहेरच्या व्यक्तीला पुन्हा संधी देणे ही भाजपची परंपरा नाही.

राज्यातील नेतृत्वाबद्दल बोलताना राऊत म्हणाले, "महाराष्ट्रात सध्या गुंडांचे राज्य सुरू झाले असून परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. जर केंद्रामध्ये बदल झाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटले की देवेंद्र फडणवीस हे केंद्रात एखाद्या प्रमुख खात्याचे नेतृत्व करण्यास योग्य आहेत, तर ते १०० टक्के केंद्रीय स्तरावर जातील."

फडणवीस यांना केंद्रीय अर्थ खाते किंवा मनुष्यबळ विकास मंत्रालय मिळू शकते, असे सांगत त्यांनी खोचक टोलाही लगावला की, आम्ही तर म्हणू त्यांनी २०२९ च्या आधीच पंतप्रधानपद मिळवावे! फडणवीस केंद्रात गेल्यास महाराष्ट्र भाजप स्वतःच्याच नेत्याला मुख्यमंत्री करेल.

Eknath Shinde
ShivsenaUBT News: आदित्य ठाकरेंचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं हे शेवटचं अधिवेशन...'

बावनकुळेंच्या नेतृत्वाचे कौतुक

जर शिंदेंनी आपला गट भाजपमध्ये विलीन केला आणि आपणच भाजपचे जन्मदाते आहोत असा दावा केला तरच त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळू शकते; अन्यथा बाहेर राहून त्यांना काहीही मिळणार नाही, असा खोचक टोला राऊतांनी लगावला.

राऊतांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे कौतुक करत म्हटले की, भाजपमध्ये अनेक मूळ आणि सक्षम नेते असून, बावनकुळे हे महाराष्ट्राचे अधिक सक्षम नेतृत्व करू शकतात, असे आपल्याला कायम वाटते.

Eknath Shinde
Manmohan Singh news : मी आत्महत्या करेन! माजी PM मनमोहन सिंग यांच्याबाबत तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्तांकडून मोठा खुलासा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com