Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय! 'या' धडाकेबाज महिला नेत्यावर सोपवली जबाबदारी

Woman leader appointed News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
Eknath shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या तोंडावरच एकनाथ शिंदे यांनी शायना एनसी यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्ते पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.

शायना एनसी यांनी राजकारणाची सुरुवात भाजपमधून केली होती. त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि महाराष्ट्र राज्याच्या कोषाध्यक्ष म्हणून समर्थपणे जबाबदारी संभाळली होती. 2024 साली त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला अचानक रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला होता. त्यानंतर मुंबईतील मुंबादेवी मतदारसंघातून त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती.

Eknath shinde
BJP And Shiv Sena Alliance Trouble : उद्धव-राज युती; भाजपचं गणित फिस्कटतंय, तर शिंदे शिवसेनेसाठी धोका!

मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून शायना एनसी यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेला एक अभ्यासपूर्ण चेहरा मिळाला होता. शिवसेनेच्या दृष्टीने ही जमेची बाजू असल्याने पक्षाने आता त्यांची राष्ट्रीय प्रवक्ते पदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर पक्षाचा आवाज येत्या काळात बुलंद होणार आहे.

Eknath shinde
Raju shetti Madhuri controversy: मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतरही राजू शेट्टी माधुरीसाठी आक्रमक; बहिष्कार सुरूच राहणार

फॅशन जगतातून राजकीय जीवनात सक्रीय होत शायना एनसी यांनी मोठी ओळख तयार केली आहे. त्यांना सक्रीय राजकारणात आणण्याचे श्रेय दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना जाते. 2004 मध्ये त्या भाजपमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यांनी जवळपास 20 वर्षे भाजपची कणखरपणे बाजू मांडली. वर्ष 2013 मध्ये त्यांना पक्षाने राष्ट्रीय प्रवक्ते पद दिले होते.

Eknath shinde
BJP Politics : कल्याण-डोंबिवलीत भाजप ठाकरेंना धक्का देणार! शिंदेंचीही अडचण वाढवणार; इन्कमिंग सुरू, महापौरपदासाठी स्वबळाचे संकेत

येत्या काळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची राष्ट्रीयस्तरावर बाजू मांडण्याची संधी त्यांना देण्यात आली आहे. शायना एनसी यांचे अभ्यासपूर्ण आणि सयंमी विवेचन ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. अक्रास्तळेपणा न करता समर्पकपणे आपली बाजू मांडण्यात त्यांची हतोटी आहे. शालीनतेने आणि अचूक शब्दांची मांडणी करत पक्षांची त्यांनी अनेकदा बाजू मांडली आहे. त्यामुळे त्यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे.

Eknath shinde
Shiv Sena politics : कायद्याचे हात एकनाथ शिंदेंपर्यंत पोहोचले! ठाकरेंच्या वकिलांनी सांगितला निकालाचा मुहूर्त

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com