
Mumbai News : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी जिनसेन मठाची माधुरी उर्फ महादेवी हत्ती परत करा या मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्यामध्ये जनतेच्या तीव्र जनभावना लक्षात आल्या आहेत. यामुळे राज्य सरकारच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. संदर्भातील बैठक मुंबई येथे पार पडली. या बैठकीनंतर ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
राजू शेट्टी म्हणाले, 'पेटा ही संस्था आर्थिक अमिष दाखवून वनतारा येथे पाळीव हत्ती देण्याची सुपारी घेतली आहे. महाराष्ट्र सरकारने ज्या हत्ती वनतारा येथे पाठविण्यात आले आहेत. त्यांची सध्या काय परिस्थती आहे. याबाबत कोणतीही तपासणी राज्य सरकारने केलेली नाही. विटा येथील श्री नाथ मठाचा हत्ती 2023 साली वनतारा येथे घेऊन गेले आहेत. आज तो हत्ती तिथे आहे, कि नाही याबाबत संशय निर्माण झाला आहे. या घटनेची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यातील जवळपास 4 ते 5 पाळीव हत्ती मयत झाले असल्याचे सांगितले. या गंभीर गोष्टीबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी वनविभागास दिले.
पेटा व वनतारा यांच्याकडून माधुरी हत्ती घेऊन जाण्यासाठी षडयंत्र रचून न्यायव्यवस्था व प्रशासनाला बटीक करून वनतारा येथे पाठविण्यात आले आहेत. माधुरी हत्तीचे 11 वेळा वैद्यकीय तपासणी केली. हे सर्व 11 अहवाल सकारात्मक आहेत. त्याबरोबरच कर्नाटक व महाराष्ट्रातील अनेक मठांना हत्ती घेऊन जाण्याबाबत नोटीसा देण्यात येत आहेत. यामुळे चांगल्या पध्दतीने देखभाल करूनही समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत.
राज्य सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करून हत्ती हे अनुसुची 1 म्हणजेच डोंगरी व कॅप्टीव्ह एलिफंट ( पाळीव हत्ती ) या दोन प्रकारात मोडतात. पाळीव हत्तीबाबत राज्य सरकारने विशेष कायदा करणे आवश्यक असून राज्य सरकारने स्वतंत्रपणे कायदा करण्याची मागणी राजू शेट्टी (Raju shetti) यांनी केली.
राज्य सरकारने जरी याबाबत मंगळवारी बैठक घेऊन सकारात्मकता दाखविली असली तरीही जोपर्यंत माधुरी हत्ती नांदणी मठात परत येणार नाही. तोपर्यंत अंबानी उद्योग समुहाच्या सर्व गोष्टीवर बहिष्कार टाकण्याचे आंदोलन महाराष्ट्रासह कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यात सुरू करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.