Election Survey 2024 : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस की उद्धव ठाकरे; सर्वेक्षणात मतदारांची पसंती कोणाला ?

Assembly Election Survey 2024 Uddhav Thackeray Eknath shinde Devendra Fadnavis : महाराष्ट्र निवडणूकपूर्व अभ्यास हा 21 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या दरम्यान करण्यात आला आहे.
Uddhav Thackeray Eknath shinde Devendra Fadnavis
Uddhav Thackeray Eknath shinde Devendra Fadnavis sarkarnama
Published on
Updated on

Election Survey 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होईल. कोणाचे सरकार येणार हे तेव्हा स्पष्ट होईल. मात्र, दिल्लीतील 'सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज' (सीएसडीएस) आणि पुण्यातील 'एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट' (सॉग) यांच्या 'लोकनीती' कार्यक्रमाद्वारे आयोजित केलेल्या महाराष्ट्र निवडणूकपूर्व अभ्यास 2024 मध्ये ग्रामीण आणि शहरी भागात मतदारांची पसंती कोणाला आहे? याची आकडेवारी समोर आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागामध्ये मतदारांनी आपली पसंती दिली आहे. त्यामध्ये शिंदे आणि ठाकरे यांना ग्रामीण भागातून मोठा पाठींबा मिळत असल्याचे दिसत आहे.

Uddhav Thackeray Eknath shinde Devendra Fadnavis
Election Survey 2024 : 5 वर्षे अन् 2 सरकारं, कोणतं ठरलं चांगलं, ठाकरे की शिंदे ? महाराष्ट्राचा सर्वात मोठा कौल आला समोर

सर्व्हेक्षणानुसार शहरी भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चांगली पसंती मतदरांकडून मिळत असल्याचे दिसते आहे. उद्धव ठाकरेंना सर्वाधिक 28 टक्के, देवेंद्र फडणवीसांना 21 टक्के तर, एकनाथ शिंदे यांना 17 टक्के मतदारांची पसंती मिळाली आहे.

शहरी मतदार पसंती (टक्केवारीत)

एकनाथ शिंदे 17

देवेंद्र फडणवीस 21

उद्धव ठाकरे 28

election survey 2024
election survey 2024 sarkarnama

ग्रामीण भागात काय स्थिती?

ग्रामीण मतदारांमध्ये उद्धव ठाकरे यांना जास्त पाठींबा असल्याचे दिसून येते एकनाथ शिंदेंना 17 टक्के, देवेंद्र फडणवीस 13 टक्के, तर उद्धव ठाकरे यांना 28 टक्के पसंती असल्याचे दिसते.

ग्रामीण मतदार पसंती (टक्केवारीत)

एकनाथ शिंदे 23

देवेंद्र फडणवीस 13

उद्धव ठाकरे 28

सर्व्हेक्षणाचा कालावधी ?

सीएसडीएस आणि सॉग यांच्या 'लोकनीती' कार्यक्रमाद्वारे आयोजित यांच्याकडून महाराष्ट्र निवडणूकपूर्व अभ्यास हा 21 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या दरम्यान करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 39 विधानसभा मतदारसंघ आणि 139 मतदान केंद्रावर एकूण 2 हजार 607 जणांची मुलाखत घेण्यात आली.

Uddhav Thackeray Eknath shinde Devendra Fadnavis
Sharad Pawar Politics : राणी लंकेंना 'तुतारी'चा 'AB' फॉर्म; 'मविआ'तील इच्छुकांचं काय होणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com